जर तुम्हीही कमी खर्चात नवीन ब्रॉडबँड कनेक्शन शोधत असाल, तर सरकारी दूरसंचार कंपनी BSNL एक उत्तम एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन सादर करते. BSNL कडे 329 रुपयांचा स्वस्त प्लॅन आहे, जो कमी किमतीचे प्लॅन्स शोधणाऱ्या वापरकर्त्यांना उपयुक्त ठरणार आहे. मात्र, ही ऑफर 30 जुलैपर्यंतच उपलब्ध असणार आहे, असे कंपनीने सांगितले आहे.
प्लॅनमध्ये 1000GB हाय-स्पीड डेटा 20Mbps पर्यंतच्या स्पीडसह मिळणार आहे. जर ही डेटा मर्यादा म्हणजे 1TB डेटा संपल्यानंतर, ग्राहकांना 4Mbps च्या वेगाने डेटा मिळणार आहे. याशिवाय, तुम्हाला प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलची सुविधा मिळणार आहे.
मात्र, लक्षात घ्या की सध्या या प्लॅनमध्ये GST समाविष्ट नाही. 18% GST नंतर या प्लॅनसाठी 388.22 रुपये खर्च येणार आहे. हा 400 रुपयांपेक्षा कमी किमतीचा प्लान आहे, ज्यामध्ये 1000GB डेटा आणि फ्री कॉलिंगचा लाभ मिळेल. अधिक माहितीसाठी BSNL च्या अधिकृत साईटला भेट द्या.
लॉकडाउनच्या काळापासून वर्क फ्रॉम होम ही कार्यप्रणाली सुरु झाली आहे. मात्र, आताही देशातील बरेच लोक वर्क फ्रॉम होम सिस्टमसह ऑफिसचे काम करत आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी ब्रॉडबँड कनेक्शन लावणे आवश्यक आहे. कारण ऑफिसचे काम मोबाईल डेटाद्वारे करणे कठीण होते, बरेचदा तुमचे काम संपण्याआधी तुमच्या फोनचा डेटा संपतो. अशा कर्मचाऱ्यांसाठी BSNL चा हा प्लॅन कमी किमतीत मिळणार आहे.