BSNLचा सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन देतो दररोज 3GB डेटा, बघा किंमत आणि इतर बेनिफिट्स

BSNLचा सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन देतो दररोज 3GB डेटा, बघा किंमत आणि इतर बेनिफिट्स
HIGHLIGHTS

BSNLचा 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा उपलब्ध

हा प्लॅन एकूण 30 दिवसांच्या वैधतेसह येतो.

भारत संचार निगम लिमिटेड BSNL टेलिकॉम नेटवर्कच्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी दररोज 3GB डेटा ऑफर करत आहे. हे भारी डेटा अशा ग्राहकांसाठी सर्वोत्तम आहे जे घरून काम करत आहेत. या प्लॅनमुळे हाय-स्पीड डेटा संपण्याची समस्या होणार नाही. BSNL साठी एकमात्र कमतरता म्हणजे 4G स्पीडची अनुपलब्धता होय, ती देखील काही महिन्यांनंतर राहणार नाही. येत्या काळात जर BSNL 4Gसादर झाल तर संपूर्ण समस्या दूर होणार आहे. चला तर जाणून घेऊयात, BSNLच्या पुढील प्लॅन्सबद्दल, जे तुम्हाला संपूर्ण 30 दिवसांसाठी दररोज 3GB डेटा देतात.

BSNLचा 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

BSNL प्रीपेड प्लॅन जो 30 दिवसांसाठी दररोज 3GB डेटा ऑफर करतो, त्या प्रीपेड प्लॅनची किंमत एकूण 299 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 30 दिवसांची वैधता मिळणार आहे. वापरकर्त्यांना यामध्ये दररोज 3GB डेटा मिळेल. म्हणजेच यात 30 दिवसांच्या कालावधीसाठी एकूण 90GB हाय-स्पीड इंटरनेट मिळेल.

हे सुद्धा वाचा : OnePlus Nord 2T 5G लवकरच भारतात लाँच होईल, मिळतील 80W फास्ट चार्जिंगसह जबरदस्त फीचर्स

त्यासोबतच, जर तुमची दैनंदिन डेटा मर्यादा संपली तर इंटरनेट स्पीड 80Kbps इतका कमी होईल. उत्तम डेटा मर्यादेसह, वापरकर्त्यांना यात अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळतात.

 Airtel आणि VI  299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

 Airtel आणि VIचा 299 रुपयांचा प्लॅन दररोज 1.5GB डेटा ऑफर करतो, जो BSNL ऑफर करत असलेल्या डेटापेक्षा निम्मा आहे. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. तर, तुम्हाला BSNLच्या या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता मिळेल. BSNLमध्ये इतर प्लॅन्ससारखे काही ऍड-ऑन बेनिफिट्स नाहीत, परंतु 3GB डेटा कॅप हेवी नेट वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo