लोकप्रिय टेलिकॉम कंपनी BSNL अनेक प्रीपेड प्लॅन ऑफर करते. या प्रीपेड प्लॅनमध्ये डेटासह अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. BSNL चे प्रीपेड प्लॅन दीर्घ वैधता आणि कमी किमतीत येतात. ज्या वापरकर्त्यांना दीर्घ वैधता आणि स्वस्त किमतीत अप्रतिम फायदे हवेत, त्यांच्यासाठी BSNL प्रीपेड प्लॅन्स योग्य पर्याय ठरतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो की, 250 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या लॉन्ग टर्म प्लॅनबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात BSNL च्या 250 रुपयांच्या प्लॅनचे तपशील-
BSNL च्या 249 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना अनेक फायदे मिळतात. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हा प्लॅन अमर्यादित डेटासह येतो. मात्र, दररोज 2GB डेटा वापरल्यानंतर, इंटरनेटचा वेग 40kbps पर्यंत कमी होणार आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 100SMS चा लाभ मिळतो. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनची वैधता एक महिन्यापेक्षा जास्त म्हणजेच एकूण 45 दिवसांपेक्षा जास्त आहे. प्लॅन रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा!
BSNL कडे आणखी एक प्लॅन 219 रुपयांच्या किमतीसह आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, BSNL प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा देखील देते. तर, प्लॅनमधील 2GB दैनिक डेटा वापरल्यानंतर, स्पीड 40kbps पर्यंत कमी होईल. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. याशिवाय, इतकेच नाही तर BSNL च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 1000 SMS मिळतात. विशेष म्हणजे या प्लॅनची वैधता दोन महिन्यांपेक्षा जास्त 70 दिवसांपर्यंत आहे.
मात्र, महत्त्वाचे लक्षात घ्या की, वापरकर्त्यांना वर नमूद केलेले बेनिफिट्स पूर्ण 70 दिवसांपर्यंत मिळणार नाही. हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर 17 दिवसांसाठी तुम्हाला अमर्यादित डेटा आणि दररोज 100SMS मिळतील. 17 दिवसांनंतर तुम्ही केवळ अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेता येईल. ज्या युजर्सना दीर्घ वैधता आणि सिम ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी प्लॅन हवा असेल, त्याच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम आहे. प्लॅन रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा!