Good News! BSNL ने ‘या’ 3 स्वस्त ब्रॉडबँड प्लॅनमध्ये वाढवला इंटरनेट स्पीड, पहा किंमत आणि नवे बेनिफिट्स 

Good News! BSNL ने ‘या’ 3 स्वस्त ब्रॉडबँड प्लॅनमध्ये वाढवला इंटरनेट स्पीड, पहा किंमत आणि नवे बेनिफिट्स 
HIGHLIGHTS

BSNL ने आता आपल्या एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन्स अपग्रेड केले आहेत.

नवीन अपग्रेडनंतर वापरकर्त्यांना bsnl च्या स्वस्त ब्रॉडबँड प्लॅनमध्ये हाय-स्पीड इंटरनेटची सुविधा मिळेल.

bsnl ने 249 रुपये, 299 रुपये आणि 329 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये अपग्रेड जारी केले.

प्रसिद्ध आणि एकमेव भारतीय दूरसंचार भारत संचार निगम लिमिटेड BSNL कंपनी नेहमीच ग्राहकांच्या सोयीचे आणि परवडणारे प्लॅन्स सादर करते. दरम्यान, कंपनीने आता आपल्या एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन्स अपग्रेड केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन अपग्रेडनंतर वापरकर्त्यांना कंपनीच्या स्वस्त ब्रॉडबँड प्लॅनमध्ये हाय-स्पीड इंटरनेटची सुविधा मिळेल.

BSNL च्या पुढील प्लॅन्समध्ये बदल

प्रसिद्ध सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने सध्याचे 3 स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन अपग्रेड केले आहेत. आता या प्लॅन्समध्ये वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा जास्त हाय-स्पीड इंटरनेट सुविधा मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने 249 रुपये, 299 रुपये आणि 329 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये अपग्रेड जारी केले आहेत.

BSNL चा 249 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

BSNL च्या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये पूर्वी यूजर्सना 10 Mbps स्पीडने इंटरनेट मिळायचे, पण आता हा तब्बल स्पीड 25 Mbps इतका वाढवला आहे. प्लॅनमध्ये यूजर्सला 10GB डेटा ऍक्सेस मिळतो. या प्लॅनमध्ये डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 2Mbps पर्यंत कमी होतो.

bsnl

BSNL चा 299 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

BSNL च्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्येही पूर्वी वापरकर्त्यांना 10 Mbps स्पीडने इंटरनेट मिळत असे, जे आता 25 Mbps पर्यंत वाढले आहे. या प्लॅनमध्ये 20GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये देखील डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 2Mbps पर्यंत कमी होतो.

BSNL चा 329 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

329 रुपयांच्या प्लॅनमध्ये 20 Mbps स्पीडवर इंटरनेटचा वापर केला जात होता, पण आता या प्लॅनमध्ये यूजर्सना 25 Mbps स्पीड इंटरनेट ऍक्सेस मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 1000GB डेटा एक्सेस दिला जातो. मात्र, इंटरनेट डेटा कोटा संपल्यानंतर, या प्लॅनमधील स्पीड 4Mbps पर्यंत कमी होतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo