खासगी दूरसंचार कंपन्यांनी Airtel, Jio आणि VI एक महिन्यापूर्वी त्यांच्या प्रीपेड, पोस्टपेड आणि डेटा पॅकच्या किमती वाढवल्या आहेत. पण सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड BSNL अजूनही त्याच पूर्वीच्या जुन्या किमतीतच युजर्सना प्लॅन ऑफर करत आहे. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत, जो एका महिन्याच्या वैधतेसह येतो. हा BSNL चा कॅलेंडर महिन्याचा रिचार्ज प्लॅन आहे. जाणून घ्या किंमत आणि बेनिफिट्स-
होय, या रिपोर्टमध्ये आम्ही BSNLच्या 239 रुपयांचा प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. BSNL चा हा प्रीपेड प्लॅन एका महिन्याच्या वैधतेसह येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, दर महिन्याला प्लॅनचे नूतनीकरण करावे लागणार आहे. म्हणजेच, जर तुम्ही हा प्लॅन आज 6 ऑगस्ट रोजी विकत घेतला तर, दर महिन्याच्या 6 तारखेला त्याचे नूतनीकरण करावे लागेल.
बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या पॅकमध्ये दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 SMS ची सुविधा मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगदेखील उपलब्ध आहे. एवढेच नाही तर मेसर्स ऑनमोबाइल ग्लोबल लिमिटेडच्या प्रोग्रेसिव्ह वेब ॲप (PWA) वर चॅलेंज एरिना मोबाइल गेमिंग सेवेसह रिचार्ज देखील येतो. लक्षात घ्या की, BSNL प्लॅन देशभरातील वेगवेगळ्या सर्कल्समध्ये वेगवेगळ्या बेनिफिट्ससह येतात.
Airtel च्या स्वस्त कॅलेंडर प्लॅनची किंमत 379 रुपये आहे. यामध्ये दररोज 2GB इंटरनेट डेटा वापरण्यासाठी उपलब्ध आहे. हा प्लॅन अमर्यादित 5G डेटा ऑफरसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्ही 31 दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगसह दररोज 100SMS चा लाभ घेऊ शकता.
तर, Jio चा सर्वात स्वस्त कॅलेंडर प्लॅन 319 रुपयांना येतो. आहे. यामध्ये दररोज 1.5GB इंटरनेट डेटा वापरण्यासाठी उपलब्ध आहे. रिलायन्स जिओचा हा प्लान अमर्यादित 4G डेटा ऑफरसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्ही 31 दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगसह दररोज 100SMS चा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे अगदी मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.