महत्त्वाचे! 180 दिवसांच्या वैधतेसह BSNL चे दोन Latest प्लॅन लाँच, बघा Price। Tech News
BSNL कंपनीने आता दोन नवीन प्लॅन्स बाजारात आणले आहेत.
या रिचार्ज प्लॅनची किंमत 411 रुपये आणि 788 रुपये इतकी आहे.
पॅकमध्ये अमर्यादित कॉलिंग किंवा OTT सारखे फायदे मिळतात का?
BSNL टेलिकॉम मार्केटमध्ये आपली जागा बनवून ठेवण्यासाठी आणि त्याच्या वापरकर्त्यांना चांगला अनुभव देण्यासाठी नवनवीन प्रीपेड प्लॅन्स आणत असते. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सिरीजमध्ये कंपनीने आता दोन नवीन प्लॅन्स बाजारात आणले आहेत. या रिचार्ज प्लॅनची किंमत 411 रुपये आणि 788 रुपये इतकी आहे. या दोन्ही प्लॅनची वैधता 180 दिवसांपर्यंत आहे. या नवीन प्लॅनमध्ये हाय-स्पीड डेटा दिला जात आहे. बघुयात सविस्तर माहिती.
BSNL चा 411 रुपयांचा प्लॅन
BSNL चा 411 रुपयांचा प्लॅन एकूण 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळेल, म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान तुम्हाला एकूण 180GB डेटा दिला जाणार आहे. जर डेटाची दैनिक मर्यादा संपली तर, डेटा स्पीड 40kbps पर्यंत कमी होईल. मात्र लक्षात घ्या की, या पॅकमध्ये अमर्यादित कॉलिंग किंवा OTT सारखे फायदे दिले जात नाहीत. यामध्ये केवळ तुम्हाला डेटा बेनिफिट्स मिळणार आहेत.
BSNL चा 788 रुपयांचा प्लॅन
BSNL चा 788 रुपयांचा प्लॅनची वैधता 180 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. म्हणजेच कंपनी या प्लॅनसह वैधतेदरम्यान एकूण 360GB डेटा देत आहे. तसेच, यामध्ये देखील डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर स्पीड 40kbps होईल.
महत्त्वाचे सांगायचे झाल्यास, BSNL ने लाँच केलेले दोन्ही पॅक डेटा व्हाउचर आहेत. हे व्हाउचर तुमच्या ऍक्टिव्ह म्हणजेच विद्यमान प्रीपेड प्लॅनसह वापरले जाऊ शकतात. हे दोन्ही व्हाउचर देशातील सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध आहेत.
अलीकडेच लाँच झालेले प्लॅन्स
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने या वर्षी जूनमध्ये दोन नवीन प्रीपेड पॅक सादर केले होते, ज्यांची किंमत 599 रुपये आणि 769 रुपये आहे.
599 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह सुपरफास्ट डेटा आणि 100SMS ऑफर करते. यासह तुम्ही अखंड कॉलिंग करू शकता. यामध्ये झिंग कॉलर ट्यून, Astrotell आणि GameOn सबस्क्रिप्शन सारखे फायदे दिले जात आहेत. हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो.
769 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि 100SMS ऑफर केले जात आहेत. या पॅकमध्ये देखील अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. याशिवाय, BSNL Tunes सोबत, हार्डी मोबाइल गेमचे सबस्क्रिप्शन, लोकधुन+झिंग आणि GAMEUM प्रीमियम गेमिंग ऍप या सर्वांचे ऍक्सेस पूर्णपणे मोफत दिले जात आहे. वरील प्लॅनप्रमाणे, या रिचार्ज प्लॅनची वैधता देखील 84 दिवसांची आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile