सरकारी दूरसंचार कंपनी BSNL च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लॅन्स आहेत. त्यामध्ये कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स ऑफर करते. या प्लॅन्सच्या यादीमध्ये मासिक ते दीर्घकालीन वैधतेसह येणाऱ्या अनेक प्लॅन्सचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक लोक सारखं सारखं रिचार्ज करण्यास कंटाळा करतात. त्यामुळे दीर्घकालीन वैधतेसह येणारे प्लॅन्स अशा युजर्ससाठी उत्तम असतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला BSNL च्या एका वार्षिक प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत.
BSNL कडे दीर्घकालीन वैधतेसह अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या प्लॅनमध्ये काही प्लॅन्स 365 दिवसांची वैधता देतात तर एक प्लॅन्स 395 दिवसांच्या वैधता प्रदान करतो. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 365 दिवसांची म्हणजेच वार्षिक प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. या प्लॅनची किंमत 1,999 रुपयांपेक्षा कमी आहे.
BSNL च्या 1,999 रुपयांच्या प्लॅनच्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत अनलिमिटेड डेटाही मिळतो. 600GB पर्यंत हाय-स्पीड डेटा उपलब्ध असेल. 600GB डेटा वापरल्यानंतर हा स्पीड कमी होऊन 40kbps होईल. मात्र, लक्षात घ्या की, तुम्हाला हे दोन्ही फायदे फक्त 30 दिवसांसाठी म्हणजे एक महिन्यासाठी मिळतील.
याव्यतिरिक्त, या फोनमध्ये दररोज 100 मोफत SMS दिले जातात. हा लाभ संपूर्ण वर्षभरासाठी वैध असेल. यासह तुमचा नंबर संपूर्ण 365 दिवस म्हणजे एका वर्षासाठी सक्रिय राहील. आम्ही तुम्हाला सांगतो की, ज्या यूजर्सना जास्त कॉलिंग आणि डेटाची गरज नाही त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे. या प्लॅनसह तुम्ही एका वर्षासाठी आपला नंबर सहज सक्रिय ठेऊ शकता.