भारत सरकारची स्वतःची दूरसंचार कंपनी BSNL कडे अनेक प्लॅन्स Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. इतर कंपन्यांच्या तुलनेत BSNL चे प्लॅन्स परवडणाऱ्या किमतीत मजबूत बेनिफिट्स देतात. BSNL आपल्या देशातील वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गेल्या काही काळापासून सतत बजेट-फ्रेंडली प्लॅन्स ऑफर करत आहे.
या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत दीर्घकाळ वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता BSNL च्या 197 रुपयांच्या प्लानचे सर्व बेनिफिट्स सविस्तर बघुयात-
हे सुद्धा वाचा: Airtel Best Plan: तब्बल 210GB डेटासह मिळतोय Amazon Prime Video सबस्क्रिप्शन अगदी Free
सरकारी BSNL कंपनीने 197 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लान सादर केला आहे. या प्लॅनमधील उपलब्ध बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, 70 दिवसांच्या वैधतेसह हा प्लॅन परवडणाऱ्या किमतीत अनेक अप्रतिम बेनिफिट्स ऑफर करत आहे. 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये 15 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा मिळतो. याशिवाय, या 15 दिवसांमध्ये ग्राहकांना अमर्यादित मोफत कॉलिंगचा लाभ देखील घेता येणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्ससह हा प्लॅन दररोज 100SMS च्या सुविधेसह येतो. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये Zing चा ऍक्सेस देखील मिळणार आहे. डेटा आणि कॉलिंग फायदे फक्त सुरुवातीच्या 15 दिवसांसाठी उपलब्ध आहेत, परंतु प्लॅन अजूनही विस्तारित वैधता ऑफर करतो. अधिक माहितीसाठी BSNL च्या अधिकृत साईटला भेट द्या.
BSNL चा 197 रुपयांचा प्लॅन त्या वापरकर्त्यांसाठी योग्य आहे, ज्यांना त्यांची सिम दीर्घकाळ सक्रिय ठेवण्यासाठी उत्तम प्लॅन हवा आहे. सरकारी कंपनीचा हा प्लॅन परवडणारा, पुरेसे बेनिफिट्स आणि वाढीव सेवा वैधता यासह बाजारातील सर्वात अप्रतिम प्लॅन आहे.