खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी प्लॅन्सच्या किमतीत दरवाढ केल्यापासून BSNL कंपनी चर्चेत आहे. तसेच, BSNL भारतीय बाजारपेठेत 4G आणि 5G सेवा देखील लवकरच सुरू करणार आहे. खाजगी कंपन्यांनी दरवाढ केल्यानंतर, बहुतेक लोक BSNL वर स्विच करत आहेत. तुम्हाला माहितीच आहे की, BSNL कंपनी आपल्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे प्लॅन्स सादर करते. ज्यामध्ये तुम्हाला वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स देखील मिळतील. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला BSNL च्या 1,859 रुपयांच्या दीर्घकालीन प्लॅनचे सर्व बेनिफिट्स जाणून घेऊयात-
BSNL कंपनीने या रिचार्ज प्लॅनची किंमत 1,859 रुपये ठेवली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा प्लॅन संपूर्ण 1 वर्षापर्यंत वैधतेसह येतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटाची सुविधा मिळेल. लक्षात घ्या की, 365 दिवसांच्या वैधतेनुसार हा प्लॅन तुम्हाला 730GB डेटाचा ॲक्सेस देणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दैनिक डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 10Kb पर्यंत कमी होईल. ज्यासाठी तुम्हाला प्रति 10Kb 3 पैसे शुल्क आकारण्यात येईल.
याव्यतिरिक्त, हा प्लॅन तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील देतो. ज्यामध्ये तुम्ही लोकल आणि STD कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. प्लॅनमधील ही सुविधा देखील वर्षभर मोफत मिळणार आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत SMS देखील मिळतील. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा.
अशा प्रकारे, तुम्ही समजू शकता की, खाजगी दूरसंचार कंपन्यांच्या तुलनेत BSNL कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी कमी किमतीत अधिक अप्रतिम बेनिफिट्ससह प्लॅन्स ऑफर करते.