सरकारी मालकीच्या टेलिकॉम कंपनी BSNLचा प्लॅन संपूर्ण वर्षाच्या वैधतेसह येतो. ज्यामध्ये फक्त 1,570 रुपयांमध्ये एक वर्षासाठी फायदे उपलब्ध आहेत. तर, या बजेटमध्ये आम्ही इतर टेलिकॉम कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल देखील सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात या किमतीत येणाऱ्या प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती…
हे सुद्धा वाचा : Google कडून Pixel फोनसाठी 5G अपडेट जारी, आता 'या' फोन्समध्ये वापरता येईल…
BSNL च्या 1,570 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. तसेच, अमर्यादित लोकल आणि STD व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट 40Kbps च्या स्पीडने चालू शकते. यात, दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. मात्र, हा प्लॅन फक्त गुजरातच्या RNSBL ग्राहकांसाठी आहे.
JIO च्या 1,559 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 24GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये 336 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर, इंटरनेट 64Kbps च्या स्पीडने चालू शकते. यात 3600 SMS उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये Jio ऍप्सचा मोफत प्रवेश देखील दिला जातो.
AIRTELच्या 1,799 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 24GB डेटा देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. तसेच, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 3600 SMS उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, यात Apollo 24|7 Circle, मोफत Hellotunes, Wynk Music मोफत आणि FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक दिला आहे.