365 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगसह BSNL चा सर्वात किफायतशीर प्लॅन, किंमतही कमी

365 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगसह BSNL चा सर्वात किफायतशीर प्लॅन, किंमतही कमी
HIGHLIGHTS

BSNL चा 1,515 रुपयांचा प्लॅन

यामध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा मिळतो.

365 दिवसांच्या प्लॅनमध्ये कंपनी भरपूर फायदे देते.

BSNL कडे अनेक स्वस्त प्लॅन्स आहेत, या कंपनीचे प्लॅन्स खूप परवडणारे आहेत. तसेच, कंपनीकडे 365 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स अतिशय किफायतशीर आहेत. या प्लॅनमध्ये दररोज भरपूर डेटा, व्हॉइस आणि इतर फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची वैधता 365 दिवस आहे. 

हे सुद्धा वाचा : 15,000 अंतर्गत नवीन 5G फोन हवंय ? बघा संपूर्ण यादी…

BSNL चा 1,515 रुपयांचा प्लॅन 

365 दिवसांच्या प्लॅनमध्ये कंपनी भरपूर फायदे देते. असाच एक प्लॅन 1,515 रुपयांचा प्लॅन  आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 1 वर्षाची वैधता मिळते. BSNL च्या सर्वोत्तम प्लॅनमध्ये समाविष्ट असलेला हा पॅक वापरकर्त्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB हायस्पीड डेटा मिळतो. जिथे इतर कंपन्या 365 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी 2,500 ते 3,000 रुपये आकारतात, तिथे तुम्हाला बीएसएनएलचा हा प्लॅन निम्म्या किंमतीत मिळेल.

 तुम्हाला यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळते. तसेच, प्लॅनमध्ये उपलब्ध दैनिक 2GB डेटा संपल्यानंतरही तुमचे इंटरनेट कनेक्शन बंद होणार नाही. परंतु येथे वेग 40Kbps पर्यंत कमी होतो. एकूण इंटरनेट बेनिफिटबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण 730GB डेटा मिळतो. मात्र, कंपनी या प्लॅनसह OTT ऍप्सचा लाभ देत नाही. 

हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त आहे ज्यांना दीर्घकाळ सिम चालू ठेवावे लागते. तुम्हाला दर महिन्याला रिचार्जच्या टेन्शनपासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्ही या प्लॅनद्वारेही रिचार्ज करू शकता. या प्लॅनबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo