जर तुम्ही इतरांपेक्षा जास्त डेटा वापरणार्यांपैकी एक असाल तर तुम्हाला BSNL चा दीर्घ वैधता प्लॅन नक्कीच आवडेल. भारत संचार निगम लिमिटेड BSNL कडे इतर कंपन्यांपेक्षा चांगले 2GB दैनंदिन डेटा व्हाउचर आहे. मात्र, या प्लॅनमध्ये फक्त 2GB दैनंदिन डेटा उपलब्ध आहे आणि मोफत SMS किंवा अमर्यादित कॉलिंगसारखे फायदे उपलब्ध नाहीत.
हे सुद्धा वाचा : 6000mAh बॅटरी असलेला Realme फोन 9 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे, बघा डील
ज्या भागात BSNL त्याची 4G LTE सेवा देत आहे, तेथे वापरकर्त्यांना या प्लॅनसह कनेक्शनचा स्पीड चांगला मिळेल. मात्र, जे वापरकर्ते सध्या कंपनीच्या 3G कव्हरेज क्षेत्रात आहेत, ते देखील या प्लॅनच्या मदतीने रिचार्ज करू शकतात. हे एक डेटा व्हाउचर आहे, याचा अर्थ असा आहे की ते ऍक्टिव्ह असलेल्या बेस पॅकसह ऍक्टिव्ह करता येईल आणि अतिरिक्त डेटाचा लाभ घेतला जाऊ शकतो.
BSNL चा 'Data_1515' व्हाउचर पूर्ण 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यावर वर्षभर रिचार्ज करण्याचा वैताग संपेल. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो, म्हणजेच एकूण 730GB डेटा मिळतो. हा डेटा संपल्यानंतर, वेग 40Kbps पर्यंत कमी होतो.
जर तुम्हाला BSNL च्या या 2GB दैनंदिन डेटा व्हाउचरने रिचार्ज करायचे असेल, तर तुम्हाला 1,515 रुपये खर्च करावे लागतील. वापरकर्त्यांना सर्व मंडळांमध्ये या प्लॅनसह रिचार्ज करण्याचा पर्याय मिळत आहे आणि कंपनीने ऑफर केल्या जाणार्या सर्वात महागड्या प्लॅनमध्ये या प्लॅनचा समावेश आहे.