BSNL कंपनी स्वस्त किमतीत जास्तीत जास्त बेनिफिट्ससह प्लॅन्स ऑफर करते.
BSNL च्या 108 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळतात अप्रतिम बेनिफिट्स
BSNL च्या 108 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा मिळतो.
भारत संचार निगम लिमिटेड BSNL भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. BSNL स्वस्त किमतीत जास्तीत जास्त बेनिफिट्ससह प्लॅन्स ऑफर करते. मात्र, BSNL चे अनेक चांगले प्लॅन्स आहेत, पण 4G नसल्यामुळे कंपनी खाजगी टेलिकॉम कंपऱ्यांच्या अजूनही मागे आहे. दरम्यान, आपणा सर्वांना माहितीच आहे की, खाजगी दूरसंचार कंपन्यांनी 5G देखील रिलीज केले आहे.
जर तुम्ही BSNL चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो फक्त तुमच्यासाठी फायदेशीर आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला BSNL च्या 108 रुपयांच्या प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत.
BSNL चा 108 रुपयांचा प्लॅन
सामान्यत: कंपन्यांकडे या किमतीत म्हणजे या स्वस्त किमतीत मासिक प्लॅन्स नसतात. परंतु, BSNL चा 108 रुपयांचा प्लॅन आहे, जो 28 दिवसांची वैधता देतो. BSNL च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड बेनिफिट्स देखील मिळतील. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग मिळेल. BSNL च्या या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा म्हणजेच एकूण 28 GB डेटा मिळतो. मात्र, लक्षात घ्या की, यात SMS सुविधा उपलब्ध नाही.
BSNL चा 107 रुपयांचा प्लॅन
BSNL कडे समान किंमत श्रेणीमध्ये आणखी एक प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत केवळ 107 रुपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 35 दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी एकूण 3GB डेटा देण्यात आला आहे. BSNLच्या प्लॅनमध्ये 200 मिनिटे कॉलिंग उपलब्ध आहे. अलीकडेच आलेल्या अहवालानुसार, या वर्षी ऑगस्टमध्ये BSNL ची 4G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.