या प्लॅनमध्ये तुम्हाला जवळपास तीन महिन्यांची वैधते मिळणार आहे.
अलीकडेच BSNL ने 'या' प्लॅनचे फायदे केले कमी
टेलिकॉम कंपन्यांचे दीर्घकाळ वैधतेसह येणारे प्लॅन्स प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसत नाही. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण BSNL कडे दीर्घकालीन वैधतेसह येणारे प्लॅन्स अगदी तुमच्या बजेटमध्ये मिळणारे आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी BSNL चा असा पावरफुल रिचार्ज प्लॅन आणला आहे, जो किफायतशीर तर आहेच आणि तो दीर्घकालीन वैधतेसह येतो.
यामध्ये तुम्हाला 1GB डेटा दिला जातो, एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला 24 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची ऑफरही दिली जाते. हे सर्व तुम्हाला फक्त ₹ 107 मध्ये मिळेल.
या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये उपलब्ध असलेली दीर्घकालीन वैधता आहे, ही वैधता संपूर्ण 84 दिवसांसाठी म्हणजेच सुमारे 3 महिन्यांसाठी आहे. या वैधतेचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा फोन रिचार्ज न करता 3 महिने सहज सिम ऍक्टिव्ह ठेवू शकता.
अलीकडेच BSNL ने या प्लॅनचे फायदे केले कमी
BSNL चा 769 रुपयांचा प्लॅन 2 GB डेटा प्रतिदिन, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS प्रतिदिन देते. प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांची वैधता मिळते. या रिचार्ज प्लॅनची वैधता आधी 90 दिवसांची होती, ती आता 84 दिवसांपर्यंत करण्यात आली आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.