स्वस्त रिचार्ज प्लॅन्समध्ये मस्त बेनिफिट्स हवे असतील तर, सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL यासाठी प्रसिद्ध आहे. BSNL कडे 107 रुपयांचा छोटू रिचार्ज आहे, जो इतरांपेक्षा उत्तम फायदे देणारा रिचार्ज प्लॅन आहे. हा रिचार्ज प्लॅन अखंडित कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करतो. हा प्लॅन वाजवी दरात येत असूनही ग्राहकांसाठी उत्तम बेनिफिट्स घेऊन येतो.
या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 200 मिनिटे लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स, MTNL नेटवर्कवरील कॉल्ससह ऑफर करतो. व्हॉईस कॉलिंग मिनिटांसोबत, वापरकर्त्यांना एकूण 3GB मोफत डेटा देखील मिळणार आहे. हा प्लॅन एका महिन्यापेक्षा जास्त म्हणजेच ग्राहकांना 35 दिवसांची वैधता प्रदान करतो.
याव्यतिरिक्त, प्लॅनमध्ये मोफत BSNL ट्यूनचा लाभ देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे आवडते गाणे ट्यून म्हणून ठेवता येईल. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे जे ग्राहक दुसऱ्या किंवा तिसऱ्यांदा रिचार्ज करतात त्यांच्यासाठी BSNL एक भारी फिचर देतोय. मागील रिचार्जची न वापरलेली वैधता पुढील रिचार्जमध्ये जमा होईल. ज्यामुळे सदस्यांना त्यांच्या प्लॅनचा कालावधी वाढवता येणार आहे आणि त्यांच्या रिचार्जचा अधिकाधिक फायदा घेता येईल.
हा प्रीपेड पॅक BSNL सेकंडरी सिम म्हणून सिम कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी रिचार्ज करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे. ज्यामुळे त्यांना कमीत कमी खर्चात कॉलिंग आणि पर्याप्त डेटाचा लाभ घेता येईल. BSNL च्या या 107 रुपयांच्या प्लॅनसह, ग्राहक एक महिन्यापेक्षा जास्त काळ त्यांची या सेवांचा लाभ घेऊ शकतात.
वरील प्लॅन बहुतेक दूरसंचार मंडळांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, आपल्या मंडळातील त्याची उपलब्धता BSNL ऍप किंवा वेबसाइटवर तपासली जाऊ शकते.