BSNL ची धमाका ऑफर ! फक्त 106 रुपयांमध्ये 84 दिवसांची वैधता, मोफत कॉलिंग आणि डेटा

Updated on 21-Feb-2023
HIGHLIGHTS

BSNL चा 106 रुपयांचा प्लॅन

या किमतीत तुम्हाला जवळपास तीन महिन्यांची वैधता मिळेल.

तसेच मोफत कॉलिंग, डेटा आणि इतरही फायदे आहेत.

BSNL आपल्या ग्राहकांना स्वस्त आणि मस्त प्लॅन्स ऑफर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर BSNL ने आपल्या प्लॅन्सवर त्याच जुन्या किमतींवर एक उत्तम ऑफर लाँच केली आहे. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो कमी किमतीत आणि दीर्घ वैधता देतो. होय, फक्त फक्त 106 रुपयांमध्ये BSNL 84 दिवसांची वैधता देत आहे. 

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! 86 हजारांचा SAMSUNG फोन मिळतोय 44 हजार रुपयांना, येथे मिळतेय भारी ऑफर

BSNL चा 106 रुपयांचा प्लॅन

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL तुम्हाला केवळ 106 रुपयांमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह 3GB डेटा इंटरनेट सुविधा देईल. हा डेटा वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारची दैनिक मर्यादा उपलब्ध असेल. तुम्ही तुमच्या गरजेनुसार डेटा वापरू शकता. डेटा संपल्यानंतरही BSNL हाय इंटरनेट स्पीड 64Kbps वेगाने ब्राउझिंग सुरू ठेवू शकते. तुम्हाला हा डेटा 84 दिवस संपण्यापूर्वी वापरावा लागेल. 

BSNL च्या या प्लॅनद्वारे तुम्हाला कॉलिंगसाठी 100 फ्री मिनिटे देखील मिळतात. ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही वापरकर्त्यांशी निवांत बोलू शकता. यासोबतच या प्लॅनद्वारे तुम्हाला 60 दिवस मोफत BSNL ट्यूनची सुविधा मिळते. BSNL चा 106 रुपयांचा प्लॅन अशा ग्राहकांसाठी बनवला आहे, ज्यांना कॉलिंग आणि डेटापेक्षा त्यांच्या प्लॅनची वैधता जास्त हवी आहे.

याच किमतीत इतर कंपन्यांचे प्लॅन्स तुम्हाला खूप कमी वैधता देतात. जर तुम्हाला केवळ सेकंडरी सिम सक्रिय ठेवण्यासाठी एखाद्या रिचार्जची आवश्यकता असेल. तर, BSNL चा 106 रुपयांचा प्लॅन तुमचयासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरेल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :