एयरटेल ने सादर केला नवीन प्रीपेड प्लान, दीर्घ वैधता असलेल्या या प्लान ची किंमत 597 रूपये
सध्या हा प्लान फक्त काही निवडक यूजर्स साठी उपलब्ध आहे आणि कदाचित हा प्लान एक ओपन मार्केट प्लान च्या रुपात सादर केला जाणार नाही.
भारती एयरटेल ने दीर्घ वैधता असलेल्या एक नवीन प्रीपेड प्लान सादर केला आहे ज्याची किंमत 597 रूपये आहे. तसे पाहता हा प्लान खासकरून वॉयस कॉलिंग यूजर्स साठी सादर करण्यात आला आहे पण सोबतच या प्लान मध्ये डाटा आणि SMS बेनेफिट्स पण मिळत आहेत. हा प्लान 168 दिवसांसाठी वैध आहे, हा थोडा वेगळा आहे कारण कंपनी अशा प्रकारच्या वैधते साठी फक्त 1,000 रुपयां वरील प्लान ऑफर करते. सध्या हा प्लान फक्त काही निवडक यूजर्स साठी उपलब्ध आहे आणि कदाचित हा प्लान एक ओपन मार्केट प्लान च्या रुपात सादर केला जाणार नाही. हा प्लान फक्त प्रीपेड यूजर्स साठी सादर करण्यात आला आहे.
या प्लान मध्ये मिळणार्या बेनेफिट्स बद्दल बोलायचे झाले तर एयरटेल या प्लान मध्ये अनलिमिटेड वॉयस कॉल्स, प्रतिदिन 100 SMS देत आहे आणि कॉलिंग प्लान मध्ये कोणतीही FUP लिमिट देण्यात आली नाही. SMS बेनेफिट्स बद्दल बोलायचे तर यूजर्स साठी या प्लान मध्ये एकूण अवधी साठी 16,800 SMS मिळत आहेत. तसेच यूजर्सना या प्लान मध्ये 10GB डाटा मिळत आहे, जो सध्याच्या डाटा प्लान्स समोर खुपच कमी आहे, वर सांगितल्या प्रमाणे हा प्लान खासकरून वॉयस कॉलिंग साठी बनवण्यात आला आहे, डाटा बेनेफिट्स साठी नाही. या प्लान ची वैधता 168 दिवस आहे.
तसेच 995 रुपयांच्या प्रीपेड प्लान बद्दल बोलायचे झाले तर हा प्लान 180 दिवसांसाठी वैध आहे आणि या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉल्स, प्रतिदिन 100 SMS आणि प्रतिमाह 1GB डाटा मिळतो या हिशोबाने या प्लान मध्ये एकूण 6GB डाटा मिळत आहे. यूजर्सना वॉयस कॉल्स मध्ये कोणत्याही लिमिट्स देण्यात आल्या नाहीत.
तसे पाहता 597 रुपयांचा हा प्लान 995 रुपयांच्या प्लान पेक्षा चांगला पर्याय आहे कारण हा जास्त डाटा सह येतो आणि या प्लान मध्ये कोणतीही डाटा लिमिट पण देण्यात आली नाही.