भारती एयरटेल ने 399 रुपयांच्या प्लान मध्ये केले बदल, मिळेल प्रतिदिन 2.4GB डाटा
399 रुपयांच्या प्लान मध्ये बदल करून कंपनी ने प्रति GB डाटा चे दर पण कमी करून Rs 1.97 केला आहे जो आतापर्यंत चा सर्वात कमी दर आहे.
भारती एयरटेल खुप काळापासून आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी चांगल्या ऑफर्स आणत आहे. कंपनी ने आता आपल्या 399 रुपयांचा प्रीपेड प्लान रिवाइज केला आहे या प्लान मध्ये आधी यूजर्सना प्रतिदिन 1.4GB हाई-स्पीड डाटा मिळत होता पण आता यूजर्सना या प्लान मध्ये प्रतिदिन 2.4GB डाटा मिळत आहे. या प्लान ची वैधता काही यूजर्स साठी 70 दिवसांची आहे आणि काहींसाठी 84 दिवसांची आहे. हे नवीन बेनेफिट्स फक्त ओरिजिनल 84 दिवसांच्या वैधता वाल्या प्लान वर उपलब्ध आहेत. 399 रुपयांच्या प्लान मध्ये बदल करून कंपनी ने प्रति GB डाटा चे दर पण कमी करून Rs 1.97 केला आहे जो आतापर्यंत चा सर्वात कमी दर आहे.
पण दुर्भाग्य हे कि हा प्लान लिमिटेड यूजर्स साठी मान्य आहे, ज्याची कंपनी कडून अपेक्षा नव्हती. पण भविष्यात एयरटेल ओपन मार्केट मध्ये हा प्लान जारी करू शकते.
399 रुपयांच्या प्लान मध्ये अन्य यूजर्सना प्रतिदिन 1.4GB डाटा मिळत आहे आणि त्याचबरोबर यूजर्सना अनलिमिटेड वॉईस कॉल्स, प्रतिदिन 100 SMS मिळत आहेत. असे पहिल्यांदाच झाले आहे की एयरटेल 399 रुपयांच्या प्लान मध्ये 2.4GB डाटा देत आहे.
दुसरीकडे रिलायंस जियो ने आपल्या 399 रुपयांच्या प्लान मध्ये 100 रूपयांची डिस्काउंट ऑफर सादर केली आहे, ज्यामुळे या प्लानची किंमत 299 रूपये होईल. पण ही ऑफर फक्त त्या यूजर्सना मिळत आहे ज्यांच्या अकाउंट मध्ये आधी पासून 50 रुपयांचे डिस्काउंट कूपन आहेत आणि अजून 50 रुपयांचा डिस्काउंट फोनपे वर कॅशबॅक च्या रुपात मिळेल. एयरटेल ने डिस्काउंट ऐवजी डाटा बेनिफिट वाढवले आहेत, आधी सांगितल्याप्रमाणे ही ऑफर काही निवडक यूजर्स साठी आहे.
जियो च्या 399 रुपयांच्या पॅक मध्ये प्रतिदिन 1.5GB डाटा मिळतो पण या प्लान ची वैधता सर्व यूजर्स साठी 84 दिवसांची आहे. एयरटेल प्रमाणे जियो पण या प्लान मध्ये अनलिमिटेड वॉईस कॉल्स आणि प्रतिदिन 100 SMS देत आहे. दोन्ही कंपन्यांनी प्लान्स मधील वॉईस कॉल्स साठी कोणतीही FUP लिमिट ठेवली नाही.