Bharat 5G Portal भारतात लाँच, मजबूत कम्युनिकेशनसह 6G नेटवर्कवर देखील होईल काम, जाणून घ्या फायदे। Tech News 

Bharat 5G Portal भारतात लाँच, मजबूत कम्युनिकेशनसह 6G नेटवर्कवर देखील होईल काम, जाणून घ्या फायदे। Tech News 
HIGHLIGHTS

दूरसंचार विभागाने Bharat 5G Portal सुरू केले आहे.

भारतात आता लवकरच 6G टेक्नॉलॉजीवर काम सुरु केले जाईल.

देशातील पहिली 6G लॅब गेल्या वर्षी बेंगळुरू, कर्नाटक येथे सुरू झाली आहे.

दूरसंचार विभागाने (DoT) Bharat 5G Portal सुरू केले आहे. देशात वेगाने 5G सेवा सुरु केल्यानंतर भारत सरकार आता पुढच्या पिढीतील टेलिकॉम तंत्रज्ञानावर काम सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. म्हणजेच भारतात आता लवकरच 6G टेक्नॉलॉजीवर काम सुरु केले जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, याच दिशेने संशोधन आणि इतर तयारी करण्याच्या उद्देशाने ‘इंडिया 5G पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात Bharat 5G Portal चे फायदे-

हे सुद्धा वाचा: RBI चा मोठा निर्णय! Paytm युजर्सना आता FasTAG ते वॉलेटपर्यंत ‘या’ सेवा मिळणार नाही, वाचा सविस्तर। Tech News

Bharat 5G Portal चे फायदे

  • Bharat 5G पोर्टल एक ‘वन-स्टॉप सोल्यूशन’ असेल, ज्यामध्ये दूरसंचार सेवांशी संबंधित अनेक कामे केली जातील.
  • हे पोर्टल सुरू झाल्यानंतर, इतर IPR म्हणजेच क्वांटम इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचाही फायदा होईल.
  • PANIIT USA च्या सहकार्याने या पोर्टलमध्ये Future Tech-Experts Registration Portal देखील समाविष्ट करण्यात आले आहे.
  • भारत 5G पोर्टलचे उद्दिष्ट भारताच्या 5G क्षमतांना चालना देण्याचे आहे. यासोबतच, दूरसंचार क्षेत्रात नावीन्य, सहयोग आणि ज्ञानाची देवाणघेवाण देशी आणि विदेशी संस्थांसोबत करण्याचे आहे.
  • या पोर्टलद्वारे 6G नेटवर्कच्या निर्मिती आणि विस्ताराशी संबंधित संशोधनालाही मदत केली जाईल.

काय म्हणाले दूरसंचार विभागाचे सचिव?

दूरसंचार विभागाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी भारत दूरसंचार कार्यक्रम भारत टेलिकॉम 2024 च्या व्यासपीठावरून भारत 5G पोर्टल लाँच केले आहे. यावेळी नीरज मित्तल म्हणाले की, सध्या भारतात एक लाखाहून अधिक स्टार्टअप्स आहेत. त्यामुळे देशाच्या विश्वासार्हतेमुळे जगातील प्रत्येक देश भारताला 5G आणि 6G तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्मथन देऊ इच्छितो.

6G इन इंडिया

6G बद्दल सांगायचे तर, देशातील पहिली 6G लॅब गेल्या वर्षी सुरू झाली आहे. या 6G लॅबचा उद्देश 6G तंत्रज्ञानावर आधारित मूलभूत तंत्रज्ञान आणि विकासाला गती देणे हा आहे. ही लॅब बेंगळुरू, कर्नाटक येथे स्थापन करण्यात आली असून तिचे बांधकाम फिनलँडची तंत्रज्ञान कंपनी Nokia ने केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 6G तंत्रज्ञान देशाच्या सामाजिक आणि औद्योगिक विकासाला गती देईल आणि भविष्यातील गरजा पूर्ण करेल. 6G तंत्रज्ञानामुळे वाहतूक, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात म्हणजे वाहतूक सुरक्षा, आरोग्य सेवा आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये प्रगत बदल दिसून येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo