सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन! अतिशय कमी किमतीत मिळेल दररोज 3GB डेटा, मोफत कॉलिंग आणि SMS चा लाभ

Updated on 15-Jul-2022
HIGHLIGHTS

Jio, Airtel आणि VI चे दैनिक 3GB डेटा देणारे प्लॅन्स

सर्वात स्वस्त JIO चा 419 रुपयांचा प्लॅन

AIRTEL च्या प्लॅनमध्ये DISNEY + HOTSTAR मोबाईलचे एक वर्षासाठी फ्री सब्सक्रिप्शन

टेलिकॉम कंपन्या युजर्ससाठी अनेक उत्तम प्लॅन ऑफर करत आहेत. वापरकर्त्यांना असे प्लॅन्स देखील आवडतात, ज्यामध्ये कमी किमतीत सर्वाधिक फायदे दिले जातात. जर तुम्ही स्वतःसाठी स्वस्त पण उत्तम प्लॅन शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. येथे आम्ही तुम्हाला Reliance Jio, Airtel (Airtel) आणि Vodafone-Idea (Vi) च्या काही स्वस्त प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग सारखे फायदे मिळतील.

हे सुद्धा वाचा : SAMSUNG कडून दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच, उत्तम कॅमेरा आणि बॅटरीसह मिळतील क्लासी फीचर्स

रिलायन्स JIO चा 419 रुपयांचा प्लॅन

कंपनीचा हा प्लॅन 28 दिवसांचा आहे. या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला दररोज 3 GB डेटा मिळेल. प्लॅनचे सदस्य देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकतात. दररोज 100 मोफत SMS देणार्‍या या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

AIRTELचा 599 रुपयांचा प्लॅन

AIRTEL चा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 3 GB डेटा देत आहे. दररोज 100 मोफत SMS देणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. AIRTEL चा हा प्लॅन अनेक उत्तम अतिरिक्त फायद्यांसह येतो. यामध्ये कंपनी DISNEY + HOTSTAR मोबाईलचे एक वर्षासाठी फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. याशिवाय, तुम्हाला प्लॅनमध्ये विंक म्युझिकचा फ्री ऍक्सेस देखील मिळेल.

VI चा 359 रुपयांचा प्लॅन

Vodafone-Idea दैनंदिन 3 GB डेटासह एक प्लॅन ऑफर करत आहे. ज्यात इतर दोन कंपन्यांपेक्षा स्वस्त आणि अधिक फायदे आहेत. कंपनीचा हा प्लॅन 28 दिवसांचा आहे. यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 3 GB डेटा मिळेल. VI च्या या प्लॅनमध्ये, दररोज 100 मोफत SMS आणि तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights यांचा समावेश आहे. प्लॅनच्या सदस्यांना Vi movies आणि TV ऍपचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :