केवळ नंबर सक्रिय ठेवण्यासाठी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स, बघा यादी…

केवळ नंबर सक्रिय ठेवण्यासाठी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स, बघा यादी…
HIGHLIGHTS

दुसरे नंबर ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी रिचार्ज प्लॅन्स

JIO आणि BSNL कडे सर्वात स्वस्त प्लॅन्स उपलब्ध

बेनिफिट्ससह मिळेल दीर्घकाळ वैधता

टेलिकॉम कंपन्यांचे महागडे रिचार्ज प्लॅन्स दोन सिम वापरणाऱ्या युजर्ससाठी मोठी समस्या बनली आहेत. अशा वापरकर्त्यांसाठी एकाच वेळी दोन सिम वापरणे खूप खर्चिक झाले आहे. मात्र, ग्राहकांच्या सोयीसाठी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये काही स्वस्त प्लॅन्स देखील जोडले आहेत, ज्यांची किंमत रु. 100 पेक्षा कमी आहे. तुम्हीही तुमचे सेकंडरी सिम सक्रिय ठेवण्यासाठी परवडणारे रिचार्ज प्लॅन्स शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. 

 या अहवालात, आम्ही तुम्हाला Jio, Airtel, VI आणि BSNL च्या स्वस्त पण दीर्घ वैधतेसह येत असलेल्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत… 

हे सुद्धा वाचा : Realme 10 सिरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन लाँच, बघुयात काय मिळेल खास…

JIOचे स्वस्त रिचार्ज प्लॅन

स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या बाबतीत जिओ सर्वोत्तम योजना ऑफर करते. जिओ 26 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन ऑफर करतो. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता आणि 2 GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. तसेच यामध्ये कॉलिंग आणि SMS सुविधा उपलब्ध नाही. जिओचा दुसरा सर्वात स्वस्त प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह 62 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या प्लॅनमध्ये 6 GB डेटा उपलब्ध आहे. यामध्येही कॉलिंग आणि SMS सुविधा उपलब्ध नाही.

VI चे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स 

VI वापरकर्त्यांसाठी सेकंडरी सिमसाठी 98 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 15 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग आणि 200 MB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये SMS सुविधा नाही. तर, VI चा 99 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 28 दिवसांच्या वैधतेसह 200 MB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि दीर्घ वैधता उपलब्ध आहे.

Airtelचे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स 

Airtelच्या स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 99 रुपयांचा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या प्लॅनसह, 28 दिवसांच्या वैधतेसह 99 रुपयांचा टॉकटाइम देखील उपलब्ध आहे. तसेच, 200 MB डेटाही उपलब्ध आहे. जर आपण 3 महिन्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल बोललो तर एअरटेलचा 455 रुपयांचा रिचार्ज हा सर्वोत्तम पर्याय आहे. 455 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग, 900 SMS आणि 6 GB डेटा मिळतो.

BSNL स्वस्त रिचार्ज प्लॅन्स 

BSNL च्या 87 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 1 GB डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लॅनची ​​वैधता 14 दिवसांपर्यंत आहे. प्लॅनमध्ये दररोज 100 SMS देखील उपलब्ध आहेत. त्याहून स्वस्त म्हणजे, BSNL चा 49 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या प्लॅनमध्ये 20 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला 100 मिनिटे व्हॉइस कॉलिंग आणि 2 GB डेटा मिळतो. जर तुम्हाला दीर्घ वैधता, कमी किमतीत व्हॉईस कॉलिंग आणि इंटरनेट सुविधा हवी असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य असेल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo