रिलायंस जियो, वोडाफोन आणि एयरटेल च्या Rs 500 च्या आत मध्ये मिळणाऱ्या पोस्टपेड प्लान्स मधील तुलना
जर तुम्हाला असे पोस्टपेड प्लान्स शोधत असाल, जे तुम्हाला चांगली सुविधा देतील पण त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत तर खाली आम्ही रिलायंस जियो, एयरटेल आणि वोडाफोन च्या काही बेस्ट प्लान्स बद्दल माहिती दिली आहे.
जर तुम्हाला असे पोस्टपेड प्लान्स शोधत असाल, जे तुम्हाला चांगली सुविधा देतील पण त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत तर खाली आम्ही रिलायंस जियो, एयरटेल आणि वोडाफोन च्या काही बेस्ट प्लान्स बद्दल माहिती दिली आहे. पण त्याआधी लक्षात असू द्या कि आज आम्ही तुम्हाला या तिन्ही कंपन्यांचे फक्त Rs 500 च्या आत मध्ये मिळणार्या प्लान्स बद्दल सांगणार आहोत. चला तर सुरू करूया आणि जाणून घेऊया, Rs 500 च्या आत मिळणार्या बेस्ट पोस्टपेड प्लान्स बद्दल.
एयरटेल पोस्टपेड प्लान्स
एयरटेल बद्दल बोलायचे झाले तर या श्रेणी मध्ये म्हणजे Rs 500 च्या आत येणारे एयरटेल कडे दोन प्लान्स आहेत, यांची किंमत क्रमश: Rs 399 आणि Rs 499 आहे. त्यामुळे जर आपण Rs 500 च्या आत येणार्या बेस्ट पोस्टपेड प्लान्स बद्दल बोलत असू तर या दोन्ही प्लान्स बद्दल बोलणे गरजेचे आहे.
Rs 399 मध्ये मिळणारा एयरटेल पोस्टपेड प्लान: या प्लान बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला एयरटेल कडून चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मग ती लोकल असो वा STD मिळत आहे, तसेच रोमिंग मध्ये पण हा प्लान वापरता येतो. तसेच एयरटेल च्या Rs 399 मधील प्लान मध्ये तुम्हाला 20GB डेटा पण मिळत आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी झालेल्या बदलांनंतर या प्लान मध्ये तुम्हाला अतिरिक्त 20GB डेटा वर्षाला मिळणार आहे.
Rs 499 मध्ये मिळणारा एयरटेल पोस्टपेड प्लान: एयरटेल चा Rs 499 मध्ये मिळणारा प्लान पण Rs 500 च्या आत मिळणार्या बेस्ट पोस्टपेड प्लान्स च्या श्रेणीत येतो. या प्लान मध्ये तुम्हाला 75GB डेटा मिळत आहे. तसेच तुम्हाला Wynk Music, एयरटेल टीवी आणि एयरटेल चे हँडसेट प्रोटेक्शन पण मिळत आहे. त्याचबरोबर इतर सुविधा यात तुम्हाला वर सांगितलेल्या प्लान प्रमाणे मिळत आहेत. एवढेच नव्हे तर तुम्हाला या प्लान सोबत एका वर्षाची अमेजॉन प्राइम ची सदस्यता पण मोफत देण्यात येत आहे.
Vodafone चे Rs 500 च्या आत मिळणारे बेस्ट पोस्टपेड प्लान्स
वोडाफोन रिचार्ज ऑफर्स; वोडाफोन कडे पण या श्रेणीत दोन चांगले प्लान्स आहेत, जे Rs 399 आणि Rs 499 मध्ये एयरटेल प्रमाणेच सुविधा देतात. पण काही सुविधा वेगळ्या असू शकतात.
वोडाफोन चा Rs 399 मध्ये मिळणारा बेस्ट पोस्टपेड प्लान: या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा मिळत आहे. तसेच तुम्हाला प्रतिमाह या प्लान मध्ये 40GB डेटा मिळत आहे आणि तुम्हाला यात 200GB रोलओवर डेटा पण मिळत आहे. तसेच एका वर्षाची अमेजॉन प्राइम सदस्यता पण तुम्हाला या प्लान सोबत मिळत आहे. सोबतच एका वर्षासाठी वोडाफोन प्ले ची सदस्यता पण तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर या प्लान मध्ये तुम्हाला 100SMS प्रतिदिन पण मिळत आहेत.
वोडाफोन चा Rs 499 मध्ये मिळणारा बेस्ट पोस्टपेड प्लान: या प्लान मध्ये पण तुम्हाला एयरटेल प्रमाणे 75GB डेटा प्रतिमाह मिळत आहे. तसेच यात तुम्हाला 200GB पर्यंत डेटा रोलओवर ची सुविधा मिळते. सोबत वोडाफोन प्ले आणि अमेजॉन प्राइम ची एका वर्षाची सदस्यता पण तुम्हाला मिळत आहे आणि मोबाईल इन्शुरन्स पण तुम्हाला या सोबत मिळत आहे. प्लान मध्ये तुम्हाला 100 SMS प्रतिदिन मिळत आहेत.
Reliance Jio चे Rs 500 च्या आत मिळणारा बेस्ट पोस्टपेड प्लान
तुम्हाला तर माहितीच आहे की रिलायंस जियो आपल्या प्रीपेड प्लान्स साठी जास्त ओळखली जाते, पण Rs 500 मध्ये मिळणार्या बेस्ट पोस्टपेड प्लान्स बद्दल बोलायचे झाले तर या श्रेणीत पण कंपनी कडे एक प्लान आहे, हा प्लान फक्त Rs 199 मध्ये मिळतो.
रिलायंस जियो चा Rs 199 मध्ये मिळणारा बेस्ट पोस्टपेड प्लान: कंपनी च्या या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे, तसेच यात 100 SMS प्रतिदिन मिळत आहेत. त्याचबरोबर या प्लान मध्ये तुम्हाला 25GB डेटा मिळत आहे, पण तुम्हाला बिल फक्त Rs 20GB चे येईल. याव्यतिरिक्त तुम्हाला जियो प्राइम साठी Rs 99 द्यावे लागतील.