आपल्या ग्राहकांसाठी टेलिकॉम कंपन्यांनी अनेक विशेष सोयी करून ठेवल्या आहेत. सध्या OTTचे वाढते क्रेझ बघता अनेक टेलिकॉम कंपन्या आपल्या प्लॅन्समध्ये OTT सब्सक्रिप्शन मोफत देत आहेत. JIO देखील या बाबतीत मागे नाही. JIO देखील आपल्या एका स्वस्त प्रीपेड प्लॅनमध्ये Prime Video सब्स्क्रिप्शन मोफत देत आहे. बघुयात सविस्तर माहिती-
रिलायन्स जिओच्या या 699 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 100GB डेटा मिळतो. जर तुमच्या क्षेत्रात रिलायन्स JIOची 5G सेवा आली असेल, तर तुम्हाला या प्लॅनसह 5G डेटाचा आस्वाद घ्यायला मिळेल. यात तुम्हाला अमर्यादित 5G हाय स्पीड डेटा मिळेल.
डेटा मर्यादा संपल्यानंतर कंपनी तुमच्याकडून प्रति GB 10 रुपये शुल्क आकारणार आहे. तसेच, तुम्हाला यात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS चा लाभ देखील दिला जाईल. एवढेच नाही तर, तुम्ही 3 ऍड ऑन फॅमिली सिम्स देखील घेऊ शकता. प्रत्येक सिमसह तुम्हाला दरमहा अतिरिक्त 5G डेटा देखील दिला जाईल.
Amazon Prime Video चा वार्षिक प्लॅन 1,499 रुपयांचा आहे. मात्र JIOचा वरील प्लॅन तुम्हाला 1 वर्षासाठी Amazon Prime Video चे सबस्क्रिप्शन देत आहे. तसेच, यासह तुम्हाला नेटफ्लिक्सचा बेसिक प्लॅनदेखील मिळेल.