Airtel चा धमाकेदार प्लॅन! 90 दिवसांसाठी संपूर्ण 5G डेटासह मिळेल Unlimited कॉलिंग-SMS, जाणून घ्या किंमत। Tech News 

Airtel चा धमाकेदार प्लॅन! 90 दिवसांसाठी संपूर्ण 5G डेटासह मिळेल Unlimited कॉलिंग-SMS, जाणून घ्या किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

Airtel कडे एक प्रीपेड प्लॅन आहे, जो 90 दिवसांच्या वैधतेसह येतो.

Airtel च्या 90 दिवसांचा प्रीपेड प्लॅनची किंमत 779 रुपये इतकी आहे.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा लाभ आणि अप्रतिम बेनिफिट्स मिळतात.

भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार भारती Airtel कडे एक प्रीपेड प्लॅन आहे, जो 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. बहुतेक भारतीय वापरकर्त्यांना 28, 56 आणि 84 दिवसांच्या सेवेच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनसह रिचार्ज करण्याची सवय आहे. पण या सर्व प्लॅन्सच्या पुढे जाऊन विचार केला तर, Airtel कडे एक आकर्षक प्लॅन आहे. होय, 90 दिवसांच्या वैधतेसह येणार प्लॅन सर्वांचे लक्ष वेधून घेतो.

Airtel च्या 90 दिवसांचा प्रीपेड प्लॅनची किंमत 779 रुपये इतकी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये या प्लॅन बऱ्याच काळापासून ऍक्टिव्ह आहे. विशेष म्हणजे प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा लाभ मिळतात.

Airtel चा 779 रुपयांचा प्लॅन

Airtel 90 Days Prepaid Plan

वर सांगितल्याप्रमाणे, Bharti Airtel चा 90 दिवसांचा प्रीपेड प्लॅन 779 मध्ये येतो. हे ग्राहकांना 1.5GB दैनंदिन डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Airtel Thanks बेनिफिट्स ऑफर करतो. Airtel Thanks बेनिफिट्समध्ये Apollo 24।7 Circle, मोफत HelloTunes, Wynk Music आणि अमर्यादित 5G डेटा यांचा समावेश आहे. FUP (फेअर यूसेज पॉलिसी) डेटा वापरल्यानंतर, वेग कमी होऊन 64 Kbps होईल.

जर तुम्हाला हा 90 दिवसांचा प्लॅन नको असेल आणि 84 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन हवे असतील, तर Airtel कडे तुमच्यासाठी अनेक पर्याय आहेत.

Airtel अमर्यादित 5G डेटासह येणारे इतर प्लॅन्स

airtel 5g
airtel 5G
  • Airtel कडे 60 दिवसांच्या वैधतेसह 519 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे, जो अमर्यादित 5G डेटासह येतो. या प्लॅनमध्ये 779 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच फायदे मिळतात.
  • तर, 30 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनची ​​किंमत 489 रुपये आहे. या प्लॅनमध्ये देखील अमर्यादित 5G डेटाचा लाभ घेता येईल. हा प्लॅन तुम्हाला 50GB डेटा देतो. या प्रीपेड रिचार्ज प्लॅन अंतर्गत दिवसाला 100SMS व्यतिरिक्त अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देखील मिळेल.
  • कंपनीचा आणखी एक मासिक प्लॅन आहे, ज्याची किंमत 509 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 60GB डेटा मर्यादेसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि एका महिन्यासाठी 100 SMS/दिवस मिळतात.

आम्ही तुम्हाला सांगतो की, विशेष गोष्ट म्हणजे वरील सर्व प्लॅन्स संपूर्ण भारतात उपलब्ध आहेत आणि वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अमर्यादित 5G डेटा लाभ देतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo