एअरटेलच्या नवीन आंतरराष्ट्रीय पॅकमध्ये मिळत आहे मोफत कॉल्स आणि डाटा
आता एयरटेलने ग्राहकांना आंतरराष्ट्रीय पॅकच्या माध्यमातून विदेशी यात्रा दरम्यान फ्री इनकमिंग कॉल आणि डेटा उपलब्ध करणार. ज्यात काही निवडक देशांमध्ये 3GB मोफत डेटासुद्धा मिळेल.
एअरटेलने मंगळवारी आपल्या ग्राहकांसाठी नवीन आंतरराष्ट्रीय पॅकची घोषणा केली. कंपनीनुसार, हे पॅक ग्राहकांना विदेशी प्रवासादरम्यान दुसरे सिम घेण्याच्या समस्येपासून मुक्ती देणार आहे. ह्या आंतरराष्ट्रीय पॅकच्या माध्यमातून काही निवडक देशांमध्ये मोफत आंतरराष्ट्रीय रोमिंग सह डेटाचासुद्धा लाभ घेऊ शकतात.
कंपनीने म्हटले आहे की, “एअरटेल स्मार्टपॅकमध्ये दुस-या पॅकच्या तुलनेत मोफत आंतरराष्ट्रीय कॉल आणि २०० टक्क्यांपर्यंत जास्त डेटा मिळेल. त्यामुळे ग्राहकांना जास्त बिलही येणार नाही.”
एअरटेलने असेही सांगितले आहे की, हा स्मार्ट पॅक कंपनीच्या वेबसाइट किंवा माय एअरटेल अॅप आणि कस्टमर केअरच्या माध्यमातून पॅक चालू करु शकतात. त्यांनी ह्यावर अधिक जोर देत असेही सांगितले आहे की, ग्राहक जेव्हा हवे तेव्हा हे पॅक चालू करु शकतात, मात्र त्यांना ह्याचे पैसे पॅक वापरतानाच करावे लागेल.
हेदेखील पाहा – ६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स
हा स्मार्टपॅक काही देशांत जसे की सिंगापूर, थायलंड, युएई, युके आणि अमेरिकेत देण्यात आला आहे. ह्या देशांमध्ये यात्रेदरम्यान आपल्याला ह्या पॅकचा लाभ घेता येईल. ह्यात मोफत इनकमिंग कॉल आणि 3GB फ्री डेटा (1GB थायलँडसाठी) मिळेल.
ह्या एअरटेल स्मार्ट पॅक सिंगापूर आणि थायलंडमध्ये यात्रेकरुंना २,४९९ रुपयांत उपलब्ध आहे ज्यात भारतात कॉल केल्यावर २९९ मोफत मिनिटेस एसएमएस शुल्क १० रुपये (लोकल आणि भारतासाठी), भारतासाठी आउटगोइंग कॉल १० रुपये प्रति मिनिट आणि डेटा पोस्ट पॅक १० रुपये प्रति MB असेल. तर अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये ह्या स्मार्टपॅकची किंमत ४,९९९ रुपये आहे. आणि ह्यात भारतात मोफत ३९९ मिनिटे, एसएमएस शुल्क १० रुपये (लोकल आणि भारतासाठी), भारतासाठी आउटगोइंग कॉल १० रुपये प्रति मिनिट आणि डेटा पोस्ट पॅक १० रुपये प्रति MB असेल.
हेदेखील वाचा – Yu ने लाँच केला यूरेका नोट फॅबलेट, किंमत १३,४९९ रुपये
हेदेखील वाचा – केवळ २ तासांत विकले गेले 1 लाख Le 2, Le 2 pro आणि Le Max 2 स्मार्टफोन्स
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile