Airtel ने दोन नवीन Airtel Extreme AirFiber प्लॅन्स लाँच केले आहेत.
Airtel च्या नव्या प्लॅन्सची किंमत 1 हजारांपेक्षा कमी आहे.
Airtel Extreme Fiber हे एक फिक्स्ड वायरलेस ऍक्सेस सोल्यूशन आहे, जे 5G युजर्सना सुपर फास्ट इंटरनेट ऑफर करते.
भारतातील दूरसंचार कंपनी Bharti Airtel ने अधिकाधिक युजर्सना आकर्षित करण्यासाठी दोन नवीन Airtel Extreme AirFiber प्लॅन्स लाँच केले आहेत. नव्या प्लॅन्सची किंमत 1 हजारांपेक्षा कमी आहे. या प्लॅनमध्ये हाय-स्पीड डेटासह, लाइव्ह चॅनेल आणि OTT ॲप्सचे सब्सक्रिप्शन मोफत दिले जात आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Airtel Extreme Fiber हे एक फिक्स्ड वायरलेस ऍक्सेस सोल्यूशन आहे, जे 5G तंत्रज्ञान वापरणाऱ्या वापरकर्त्यांना सुपर फास्ट इंटरनेट प्रदान करते. चला तर मग बघुयात नव्या Airtel Xtreme Airfiber प्लॅन्सची किंमत-
Airtel Xtreme Airfiber New Plans
Airtel चे नवीन प्लॅन्स किंमत 699 आणि 999 रुपये आहे. दोन्ही प्लॅन्समध्ये 1TB पर्यंत डेटा अनुक्रमे 40Mbps आणि 100Mbps वेगाने उपलब्ध आहे. जर डेटा मर्यादा वैधतेपूर्वी संपली तर डेटाचा वेग कमी होईल. या दोन्ही नवीन प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 4K Android बॉक्ससह 350 हून अधिक थेट टीव्ही चॅनेल, Airtel Extreme Play आणि Disney Plus Hotstar चे सबस्क्रिप्शन ऑफर केले जात आहे.
विशेष म्हणजे Airtel चे नवीन Xtreme Airfiber प्लॅन सहा महिने आणि एका वर्षासाठी खरेदी करता येतील. आनंदाची बातमी म्हणजे आता ग्राहकांना यासाठी इन्स्टॉलेशन चार्जेस द्यावे लागणार नाहीत. मात्र, लक्षात घ्या की, केवळ नोएडा आणि गाझियाबादच्या वापरकर्त्यांसाठी ही सेवा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
अलीकडेच लाँच झालेले नवे प्लॅन्स
Airtel ने अलीकडेच 3 नवीन रोमिंग पॅक सादर केले आहेत. या प्लॅन्सची किंमत 195, 295 आणि 595 रुपये आहे. या तीन प्लॅनमध्ये 1GB पर्यंत डेटा दिला जात आहे. तसेच, नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये 100 मिनिटे आउटगोइंग कॉल आणि 100 SMS उपलब्ध आहेत. हे पॅक अधिकृत वेबसाइटवर जाऊन रिचार्ज करता येतील.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.