Airtel कंपनी आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी नेहमीच उत्तम प्लॅन्स आणत असते. आता कंपनीने आपल्या यूजर्ससाठी नवीन ब्रॉडबँड प्लॅन लाँच केला आहे. Airtel Xstream Fiber Broadband Lite प्लॅन असे या प्लॅनचे नाव आहे. या प्लॅनची किमंत 219 रुपये प्रति महिना असेल. एवढेच नाही तर, या प्लॅनसोबत कंपनी मोफत राउटर आणि उत्तम स्पीड देणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
Airtelचा हा नवीन प्लॅन लोकप्रिय Jio Fiber प्लॅनला टक्कर देऊ शकतो, असे म्हटले जात आहे. Jio Fiber प्लॅनची किंमत 198 रुपये आहे. JIO चा हा प्लॅनदेखील अलीकडेच लाँच करण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता Airtel Xtreme Broadband Lite Planचे सविस्तर तपशील जाणून घेऊया.
Airtel Xtreme Broadband Lite प्लॅन
कंपनीने अगदी शांतपणे हा प्लॅन आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामील केला आहे. Airtel Xstream Fiber Broadband Lite प्लॅनची किंमत 219 रुपये प्रति महिना असेल. यामध्ये यूजर्सना 10Mbps च्या स्पीडने अमर्यादित डेटा मिळणार आहे, सध्या कंपनी या प्लॅनचे 12 महिन्यांचे सबस्क्रिप्शन देत आहे.
अशाप्रकारे एकूण वापरकर्त्यांना या प्लॅनसाठी 3,101 रुपये खर्च करावे लागणार आहे. युजर्स वर्षभर या प्लॅनचा लाभ घेऊ शकतील Airtel च्या अधिकृत वेबसाइटनुसार कंपनी या प्लॅनसह यूजर्सना मोफत राउटर देखील देणार आहे. म्हणजेच तुम्हाला राउटरसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही Airtel च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.