Airtel Xstream AirFiber New Plan: कंपनीने लाँच केला नवीन वार्षिक प्लॅन, Free इंस्टॉलेशन देखील उपलब्ध 

Airtel Xstream AirFiber New Plan: कंपनीने लाँच केला नवीन वार्षिक प्लॅन, Free इंस्टॉलेशन देखील उपलब्ध 
HIGHLIGHTS

Airtel कंपनीने ऑगस्ट 2023 मध्ये Airtel Xstream AirFiber सर्व्हिस लाँच केली होती.

Airtel Xstream AirFiber चे नवे वार्षिक प्लॅन सादर करण्यात आले आहे.

नवा वार्षिक प्लॅन सध्या केवळ दोन शहरांसाठी सादर करण्यात आला आहे.

Airtel कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये 5G FWA म्हणजेच फिक्स्ड-वायरलेस एक्सेस सर्व्हिस Xstream AirFiber लाँच केली. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीने 6 महिन्यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅनसह ही सेवा सुरू केली होती. त्यानंतर, आता कंपनीने एक वार्षिक प्लॅन देखील सादर केला आहे. या नवीन सबस्क्रिप्शन प्लॅनसह, वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेल्या फायद्यांमध्ये काही विशेष बदल देखील करण्यात आले आहेत.

दरम्यान, या प्लॅनसह कंपनीने Airtel Xstream AirFiber राउटरच्या डिझाइनमध्येही बदल केला आहे. चला तर जाणून घेऊयात याबाबत सर्व तपशील-

Airtel Xstream AirFiber राउटर

Airtelच्या वेबसाइटद्वारे नवीन Xstream AirFiber सब्स्क्रिप्शन प्लॅनबद्दल माहिती प्राप्त झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅन फक्त नोएडा आणि गाझियाबादमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय, नवीन डिझाइन केलेले Airtel Xstream AirFiber राउटर देखील साइटवर पाहिले जाऊ शकते.

airtel xstreme airfiber

Airtel Xstream AirFiber वार्षिक प्लॅनची किंमत

Airtel Xstream AirFiber च्या वार्षिक प्लॅनची ​​किंमत पाहिली तर तो प्रति महिना 799 रुपयांना येतो. मात्र, आता कंपनीने दोन शहरांसाठी 12 महिन्यांचा प्लॅन देखील सादर केला आहे. या प्लॅनची ​​किंमत 11,314 रुपये +GST इतकी आहे. या प्लॅन अंतर्गत यूजर्सला कोणतेही इन्स्टॉलेशन चार्ज द्यावे लागणार नाहीत. तसेच, या प्लॅनसह इन्स्टॉलेशन चार्ज मोफत आहेत.

Airtel Xstreme AirFiber new router
Airtel Xstreme AirFiber new router (Image Source: Tanay Singh Thakur X Twitter)

प्लॅनमधील उपलब्ध फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या अंतर्गत वापरकर्ते 1TB डेटा वापरू शकतात. इंटरनेट डेटा कोटा संपल्यानंतर, वेग 2Mbps पर्यंत कमी होतो. येत्या काही दिवसांत हा प्लॅन इतर शहरांसाठीही सुरू होण्याची शक्यता आहे. Xstream AirFiber अंतर्गत 6 महिन्यांच्या प्लॅनची किंमत 6,657 रुपये (GST आणि 1000 रुपये इन्स्टॉलेशन चार्ज) आहे. या प्लॅन अंतर्गत, वापरकर्त्यांना 100 Mbps च्या वेगाने हाय-स्पीड इंटरनेट मिळते. अधिक माहितीसाठी तुम्ही Airtel च्या अधिकृत साईटला भेट देऊ शकता.

Airtel 5G FWA (Xstream AirFiber) सेवा वापरण्यासाठी, तुम्हाला प्रथम Airtel स्टोअरमध्ये जावे लागेल आणि Xstream AirFiber डिव्हाइस खरेदी करावे लागेल. तुम्ही https://www.airtel.in/xstream-airfiber द्वारे डिव्हाइसची ऑनलाइन ऑर्डर देखील करू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo