मोबाइल कनेक्शनमध्ये Airtel आधीच आघाडीवर आहे. आता ते Airtel Xstream फायबरद्वारे हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवा नेटवर्क देखील ऑफर करत आहे. ब्रॉडबँड कनेक्शनसह, एअरटेल 40mbps पासून 1gbps पर्यंत इंटरनेट गतीसह विविध प्लॅन्स ऑफर करते. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि OTT फायदे देखील मिळतात.
हे सुद्धा वाचा : प्रतीक्षा संपली ! Tecno Phantom V Fold स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
यापैकी एक प्लॅन घरगुती कनेक्शनसाठी उत्तम आहे आणि 100mbps इंटरनेट स्पीड देतो. 100mbps Xstream फायबर प्लॅनची किंमत 799 रुपये आहे. या प्लॅनमध्ये अतिरिक्त फायद्यांसह इंटरनेट आणि कॉलिंग फीचर्स मिळतात. हा प्लॅन 4K मध्ये हाय कॉलिटीचा OTT कंटेंट स्ट्रीम करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन हवे असलेल्या वापरकर्त्यांसाठी एक चांगला पर्याय आहे.
Airtel Xstream Fiber चा स्टॅंडर्ड प्लॅन ग्राहकांना 100mbps पर्यंतच्या स्पीडमध्ये अमर्यादित इंटरनेट ऍक्सेस देतो. या व्यतिरिक्त, ग्राहक लँडलाइन सुविधेचा लाभ घेऊ शकतात. ज्यामुळे त्यांना अमर्यादित लोकल आणि STD कॉल करता येतील. याशिवाय एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम सबस्क्रिप्शन, अपोलो 24/7, फास्टॅग रिचार्ज आणि विंक म्युझिकसह या प्लॅनमध्ये Airtel Thanks फायदे समाविष्ट आहेत.
या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना Airtel Xstream ऍपवर 14+ OTT चॅनेलच्या लाइव्ह स्पोर्ट्स आणि लायब्ररीमध्ये प्रवेश मिळतो. यामध्ये SonyLIV, ErosNow, LionsgatePlay, Ultra, ManoramaMax, HoiChoi, Epic ON, ShemarooMe, Divo, Dollywood, Nammaflix, Klikk यांचा समावेश आहे. ShortsTV, Docube, Hungamaplay, Social Swag, Choupal आणि Multiscreen Entertainment मध्ये प्रवेश समाविष्ट आहे. Airtel Xrtream प्लॅन एकाच वेळी तब्बल 60 डिव्हाइस कनेक्शनला सपोर्ट करू शकतो.