भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी भारती Airtelने परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी वर्ल्ड पास रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. प्लॅनची सुरुवातीची किंमत 649 रुपये आहे. प्लॅनमध्ये एअरटेल यूजर्सना 184 देशांमध्ये मोफत इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा मिळणार आहे. आतापर्यंत टेलिकॉम कंपन्यांकडे वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन आणि पॅक होते.
हे सुद्धा वाचा : मनोरंजन होणार दुप्पट ! 200 रुपये अधिक भरून मिळतील 14 OTT सबस्क्रिप्शन, Jio ची खास ऑफर
भारतात या वर्षी आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत तीन पटीने वाढ झाली आहे. येत्या वर्षभरात हा आकडा दुपटीने वाढणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत परदेशात प्रवास करणाऱ्यांना लक्षात घेऊन एअरटेलने हा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना जगातील कोणत्याही देशात 24X7 कॉल सेंटर सपोर्ट देखील मिळेल.
649 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये फक्त एक दिवसाची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनसह, लोकल आणि भारतात कॉलिंगसाठी 100 मिनिटे आणि 500 MB हाय स्पीड डेटा उपलब्ध आहे.
2,999 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये 10 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 5 GB डेटा आणि कॉलिंगसाठी दररोज 100 मिनिटे आहेत.
3,999 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये एका महिन्याची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 100 मिनिटे व्हॉइस कॉलिंग आणि 12 GB डेटा प्रतिदिन मिळतो.
5,999 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये 900 मिनिटे व्हॉइस कॉलिंग आणि 2 GB डेटा 90 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे.
649 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये एक दिवसाच्या वैधतेसह 500 एमबी डेटा आणि 100 मिनिटे कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे.
899 रुपयांचा प्लॅन : यामध्ये 10 दिवसांची वैधता, 100 मिनिटे कॉलिंग आणि 5 GB डेटा मिळतो.
2,998 रुपयांचा वर्ल्ड पास प्री-पेड प्लॅन : यामध्ये 200 मिनिटे कॉलिंग आणि 30 दिवसांच्या वैधतेसह 5GB डेटा ऑफर करतो.
2,997 रुपयांचा प्लॅन : प्लॅनमध्ये एक वर्षाची वैधता आणि 100 मिनिटे व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. तसेच, 2 GB डेटा देण्यात आला आहे.