स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन्सच्या शोधात आहात ? तर सध्या अनेक दूरसंचार कंपन्या 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत फास्ट स्पीडचे प्लॅन ऑफर करत आहेत. Airtel आपल्या ग्राहकांना 499 रुपयांमध्ये 40 Mbps स्पीड प्लॅन देत आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत, जो एअरटेलपेक्षा स्वस्तात तर आहेच पण त्याचप्रमाणे फायदे सुद्धा देतो.
खरं तर आम्ही You Broadband 40 mbps च्या प्लॅनबद्दल बोलत आहोत. त्यामुळे, तुमच्यासाठी दोनपैकी कोणता प्लॅन सर्वोत्कृष्ट असेल याबद्दल तुम्ही गोंधळात असाल, तर आम्ही तुम्हाला या लेखात दोन्ही प्लॅन्सच्या तपशीलांची तुलना करून सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्यासाठी कोणता प्लॅन अधिक योग्य राहील, हे तुम्हाला सहजपणे ठरवता येईल.
हे सुद्धा वाचा : Google Maps वर 'अशा'प्रकारे बघा रस्त्यांचे 360° व्ह्यू, जाणून घ्या Android युजर्ससाठी स्टेप्स
Airtel Xstream Fiber 40 Mbps प्लॅन 499 रुपयांमध्ये येतो. एअरटेलने ऑफर केलेला हा एंट्री-लेव्हल प्लॅन आहे. जर तुम्ही तुमच्या घरात एकटे असाल किंवा फक्त दोन लोकांना इंटरनेटची गरज असेल ,तर हा प्लॅन तुमच्यासाठी पुरेसा आहे. या एअरटेल प्लॅनसह, वापरकर्त्यांना मासिक डेटा 3.3TB मिळेल, जो तुम्ही 40 Mbps च्या स्पीडसह वापरू शकता. योजना विविध वैधतेसह उपलब्ध आहे.
या व्यतिरिक्त, यामध्ये वापरकर्त्यांना एअरटेल थँक्स बेनिफिट्सचा ऍक्सेस मिळतो. ज्या अंतर्गत त्यांना एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम, अपोलो 24/7 सर्कल, फास्टॅग आणि विंक म्युझिकमध्ये प्रवेश मिळतो. कंपनी व्हॉईस कॉलसाठी फिक्स्ड लाइन देखील ऑफर करते. कृपया बिलात कर देखील समाविष्ट केला जाईल याची नोंद घ्यावी.
You Broadbandचा 40 mbps प्लॅन दरमहा 400 रुपयांमध्ये येतो, यासोबत कर स्वतंत्रपणे आकारला जाईल. एअरटेलच्या 40 mbps प्लॅनपेक्षा हा प्लॅन 100 रुपये स्वस्त आहे. प्लॅनमध्ये एकूण 3.5TB मासिक डेटा उपलब्ध आहे, जो Airtel पेक्षा जास्त आहे. U Broadband वरून कॉल करण्यासाठी तुम्ही फिक्स्ड लाइन कनेक्शन देखील मिळवू शकता. परंतु यामध्ये तुम्हाला एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरसह मिळणारे अतिरिक्त फायदे मिळत नाहीत.
यु ब्रॉडबँडचा 40 Mbps प्लॅन Airtel च्या प्लॅनपेक्षा खूपच स्वस्त आहे आणि अधिक डेटा देखील देतो. मात्र, यू ब्रॉडबँड सर्वत्र उपलब्ध नाही.