Airtel आणि Vodafone Idea भारतातील आघाडीचे टेलिकॉम दिग्गज आहेत. तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याच्या त्रासामुळे त्रास होत असेल, तर तीन महिन्यांच्या वैधतेसह येणारे प्रीपेड प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहेत. Airtel आणि Vodafone Idea कडे तीन महिन्यांच्या वैधतेसह 719 रुपयांचे प्लॅन्स आहेत. दोन्ही कंपन्यांचे हे प्लॅन्स सामान किमतीत आकर्षक आणि वेगवेगळे बेनिफिट्स देतात. चला तर मग बघुयात 719 रुपयांच्या प्लँन्सचे बेनिफिट्स-
Also Read: बहुप्रतीक्षित Xiaomi 14 Civi भारतात शानदार फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व तपशील
Airtel च्या 719 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा उपलब्ध आहे. कंपनीचा हा प्लॅन जवळपास तीन महिने म्हणजेच 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये दररोज 100 SMS दिले जातात.
प्लॅनमध्ये उपलब्ध इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात RewardsMini सबस्क्रिप्शन, Apollo 24|7 Circle, मोफत Hellotunes आणि Wynk Music सबस्क्रिप्शन यांचा समावेश आहे.
Vodafone Idea चा 719 रुपयांचा प्रीपेड प्लॅन दररोज 1.5GB डेटा ऑफर करतो. या प्लॅनची वैधता देखील वरील प्लॅनप्रमाणे एकूण 84 दिवस आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये दररोज 100SMS ची सुविधा देखील देण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड नाईट डेटा उपलब्ध आहे, ज्यामध्ये मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत डेटा वापरता येईल. तर वीकेंड डेटा रोलओव्हर अंतर्गत सोमवार ते शुक्रवारचा उर्वरित डेटा शनिवार आणि रविवारी वापरता येईल. कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय दरमहा 2GB डेटा बॅकअपची सुविधा उपलब्ध आहे. दैनंदिन मर्यादा गाठल्यानंतर इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.
वरील दोन्ही प्लॅनमधील बेनिफिट्स बघता Vodafone Idea चा 719 रुपयांचा प्लॅन Airtel प्लॅनपेक्षा जास्त आकर्षक बेनिफिट्ससह येतो. मात्र, Airtel च्या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटादेखील उपलब्ध आहे. त्यामुळे, तुम्ही तुमच्या क्षेत्रातील दोन्ही कंपन्यांच्या नेटवर्कची उपलब्धता चेक करून आणि गरजेनुसार बेनिफिट्स बघूनच प्लॅन्सची निवड करावी.