Airtel, Jio आणि Vi या सध्या देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहे. या तिन्ही कंपन्यांकडे ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्री-पेड आणि पोस्टपेड प्लॅन आहेत. Airtel, Jio आणि Vodafone Idea ने गेल्या वर्षी त्यांच्या प्री-पेड प्लॅन्समध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यानंतर या वर्षीही या कंपन्यांची रिचार्ज प्लॅन महाग करण्याची तयारी सुरू आहे. Airtel, Jio आणि Vi कडे सर्वाधिक मागणी असलेला 84 दिवसांचा प्लॅन आहे. Airtel आणि Vodafone Idea दोन्हीकडे समान किंमतीचे प्लॅन आहेत, त्याबरोबरच दोन्ही कंपन्या या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता देखील देतात. चला जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दोनपैकी कोणती योजना सर्वोत्तम आहे…
Airtelच्या या प्लानची किंमत 839 रुपये आहे. एअरटेलच्या 839 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. याशिवाय या प्लानमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS देखील उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध आहे. शिवाय, या प्लॅनमध्ये Amazon Prime Video चे मोफत सबस्क्रिप्शन एका महिन्यासाठी मिळेल.
Viचा 84 दिवसांच्या वैधतेसह येण्याऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत देखील 839 रुपये आहे. यामध्ये दररोज 2 GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय, यामध्ये Binge All Night ऑफर देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्हाला रात्रभर मोफत इंटरनेट वापरता येईल. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यामध्ये वीकेंड डेटा रोलओव्हरचीही सुविधा आहे. जेणेकरून तुम्हाला आठवड्याच्या शेवटी उर्वरित डेटा वापरता येईल.
84 दिवसांच्या वैधतेसह येणारा Jioच्या रिचार्ज प्लॅनवर देखील एक नजर टाकुयात, या जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा उपलब्ध आहे. Jioच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 719 रुपये आहे. तसेच, यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज 100 SMS ऑफर केले जात आहेत. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Security, Jio Cinema आणि Jio Cloudवर मोफत ऍक्सेस मिळेल.