भारती एयरटेल रिलायंस जियोला टक्कर देण्याचा प्रयत्न खुप आधी पासून करत आहे. आता पण कंपनी ने असेच काहीसे केले आहे, जियो सोबत चालू असलेल्या आपल्या लढाईला नवीन वळण देत एयरटेल ने दोन नवीन डाटा अॅड-ऑन प्लान्स सादर केले आहेत, हे प्लान Rs 49 आणि Rs 92 च्या किंमतीत येतात, या दोन्ही प्लान्स मध्ये तुम्हाला क्रमश: 3GB आणि 6GB डाटा मिळत आहे. पण या ऑफर मध्ये एक मोठी कॅच ही दिसत आहे की नेमकी या प्लान साठी काय एलिजिबिलिटी आहे. कारण एयरटेल च्या प्रत्येक यूजर ला या ऑफर चा लाभ मिळणार नाही, मग कोणाला या ऑफर चा लाभ मिळेल.
कोणाला या ऑफर चा लाभ मिळणार आहे याबद्दल बोलायचे झाले तर ज्या एयरटेल च्या यूजर्स कडे अनलिमिटेड कॉम्बो प्लान आहे, हे दोन्ही अॅड-ऑन प्लान फक्त त्या यूजर्स साठी आहे. तसेच जे अनलिमिटेड कॉम्बो वापरत आहेत तेसुद्धा यांना अनलिमिटेड प्लान ची वैधता असे पर्यंत वापरू शकतील.
पण इतर काही यूजर्स साठी म्हणजे या एलिजिबिलिटी च्या बाहेर असलेल्या एयरटेल यूजर्सना Rs 49 वाल्या प्लान मध्ये 3GB डाटा तीन दिवसांसाठी मिळत आहे, त्याचबरोबर Rs 92 वाल्या प्लान मध्ये 6GB डाटा 7 दिवसांसाठी मिळत आहे. पण बाकी यूजर्स साठी जे कोणताही अनलिमिटेड कॉम्बो वापरता आहेत, त्यांच्यासाठी हा प्लान त्यांच्या वैधता नुसार चालेल.
उदाहरणार्थ, जर कंपनी च्या कोणत्याही यूजर कडे Rs 448 वाला अनलिमिटेड कॉम्बो प्लान आहे, त्यात अनलिमिटेड वॉयस कॉलिंग सोबत फ्री SMS आणि 1.4GB डाटा प्रतिदिन मिळत आहे, जर तुम्हाला या प्लान मध्ये थोडाफार डाटा अजून हवा असेल तर तुम्ही या दोन्ही प्लान्स मधील एकाची निवड करू शकता आणि या प्लान ची वैधता पण 84 दिवसांची होईल, कारण Rs 448 वाला प्लान 84 दिवसांच्या वैधते सह येतो.