Airtel VS Jio: 70 रुपयांपेक्षा कमी किमतीत स्वस्तात मस्त प्लॅन! कोणता प्लॅन आहे तुमच्यासाठी सर्वोत्तम…
Airtel आणि Jioचे 70 रुपयांपेक्षा कमी किमतीचे प्लॅन्स
या दोन्ही प्लॅनमध्ये केवळ इंटरनेट डेटाचा लाभ मिळेल.
जाणून घेऊयात या प्लॅन्सची वैधता
Airtel ने अलीकडेच 30 दिवसांच्या वैधतेसह 199 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. आता कंपनीने आपला सर्वात स्वस्त डेटा प्लॅन देखील लाँच केला आहे. म्हणजेच तुम्हाला Airtel कडून 65 रुपयांच्या किंमतीत येणार्या प्लॅनबद्दल माहिती मिळू शकते.
हे सुद्धा वाचा : Oppo स्मार्टफोन युजर्ससाठी खुशखबर! मिळेल 5G इंटरनेट स्पीडची खरी मजा, चुटकीसरशी होतील सर्व कामे
Airtel चा 65 रुपयांच्या प्लॅन कंपनीने नुकताच बाजारात आणला आहे. या व्यतिरिक्त JIO चा एक प्लॅन देखील बाजारात आहे ज्याची किंमत 61 रुपये आहे. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या 65 रुपयांच्या प्लॅन आणि रिलायन्स जिओच्या 61 रुपयांच्या प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. तुमच्यासाठी कोणती योजना सर्वोत्तम ठरणार आहे ते जाणून घेऊयात…
AIRTEL चा 65 रुपयांचा प्लॅन
एअरटेलचा 65 रुपयांचा प्लॅन डेटा व्हाउचर म्हणून सादर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 4GB 4G डेटा मिळेल. मात्र, या प्लॅनमध्ये तुम्हाला ना कॉलिंग किंवा SMS चा कोणताही फायदा मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त 4GB डेटा मिळेल. तुमच्या सध्याच्या प्लॅनच्या वैधतेइतकी या प्लॅनची वैधता असणार आहे. जर तुमचा प्रायमरी प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येत असेल, तर या प्लॅनची वैधता देखील केवळ 28 दिवसांची असणार आहे.
JIO चा 61 रुपयांचा प्लॅन
Jio च्या 61 रुपयांच्या प्लॅनबद्दल चर्चा केली तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला 6GB डेटा दिला जात आहे. यात तुम्हाला फक्त 4G डेटा मिळणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणताही कॉल किंवा SMS चा लाभ मिळत नाही. या प्लॅनची वैधता तीच आहे, जी तुम्ही Airtel च्या वरील प्लॅनमध्ये आपण पाहिली.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile