Airtel की Jio: 30 दिवसांच्या वैधतेसह येणारा कुणाचा प्लॅन आहे बेस्ट? ‘येथे’ मिळतायेत जास्त लाभ

Airtel की Jio: 30 दिवसांच्या वैधतेसह येणारा कुणाचा प्लॅन आहे बेस्ट? ‘येथे’ मिळतायेत जास्त लाभ
HIGHLIGHTS

Airtel आणि Reliance Jio कडे 30 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्रीपेड प्लॅन आहेत.

प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल, 25GB डेटा, 100 दैनिक SMS चा लाभ दिला जात आहे.

बघा इतर बेनिफिट्स देण्यात कुणाचा प्लॅन ठरतोय बेस्ट

देशातील आघाडीच्या नेटवर्क प्रदाता कंपन्या Airtel आणि Reliance Jio कडे प्रीपेड प्लॅन आहेत, जे 30 दिवस चालतात. होय, कंपन्यांच्या बहुतेक प्लॅन्सची वैधता 28 दिवसांची असते. मात्र, मधल्या काळापासून कंपन्या संपूर्ण 30 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स देखील ऑफर करत आहे. आज आम्ही तुम्हाला दोन्ही कंपन्यांच्या स्वस्त 30 दिवसांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. ज्यानंतर तुम्ही स्वतःच ठरवू शकाल की कोणाचा रिचार्ज सर्वोत्तम आहे. 

Airtel चा 296 रुपयांचा रिचार्ज प्लॅन:

 प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल, 25GB डेटा, 100 दैनिक SMS चा लाभ दिला जात आहे. त्याबरोबरच, विंक म्युझिक सबस्क्रिप्शन, फ्री हॅलोट्यून्स, FasTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि 3 महिन्यांचे अपोलो सबस्क्रिप्शन दिले जाते. विशेष बाब म्हणजे या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे.

airtel vs jio

Jio चा 296 रुपयांचा रिचार्ज प्लॅन: 

रिलायन्स जिओच्या 296 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 30 दिवसांच्या वैधतेसह मोफत अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना FUP मर्यादेशिवाय 25GB डेटा मिळतो. हे कंपनीच्या साइटवर Jio Freedom Plan म्हणून देखील सूचीबद्ध आहे. यासोबतच प्लॅनसोबत जिओ Apps चे सबस्क्रिप्शनही दिले जात आहे.

खरं तर दोन्ही कंपन्या जवळपास समान कॉमन बेनिफिट्स देतात. पण इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास Airtel कंपनी Jio पेक्षा अधिक आणि वेगवेगळे बेनिफिट ऑफर करत आहे, असे दिसून येते.  

 पण, तुम्हाला माहिती आहे का की या शर्यतीत सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी BSNL देखील सामील आहे. होय, BSNL कडे 30 दिवसांच्या वैधतेसह अनेक प्लॅन्स आहेत. या किंमत श्रेणीमध्ये BSNL कडे 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे.

bsnl

BSNL चा 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

BSNL च्या 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा मिळतो, एकूण डेटा 90GB होतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये यूजर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग दिले जाते. तसेच, हा प्लॅन दररोज 100SMS ऑफर करतो.

किमतीनुसार, BSNL चा प्लॅन AIRTEL आणि JIO च्या प्लॅनपेक्षा फक्त 3 रुपयांनी महाग आहे. परंतु, दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनपेक्षा जवळपास तिप्पट डेटा ऑफर करत आहे. जर तुम्ही अधिक डेटासह 30 दिवसांचा प्लॅन पाहिला तर BSNL पुढे दिसेल. मात्र, तुम्हाला BSNL च्या प्लॅनमध्ये JIO किंवा AIRTEL सारखा हाय स्पीड डेटा मिळत नाही. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo