Airtel आणि Jio या दोन्ही कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन अगदी सारखे आहेत. मात्र, बेनिफिट्सच्या बाबतीत Jio वापरकर्त्यांना Airtel वापरकर्त्यांच्या तुलनेत दिलासा मिळतो. Jio कंपनीचे काही प्लॅन एअरटेल कंपनीपेक्षा स्वस्त आणि अधिक फायद्यांसह सुसज्ज आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता दोन्ही कंपनीच्या 155 रुपयांचा प्लॅनचे डिटेल्स बघू…
हे सुद्धा वाचा : 365 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगसह BSNL चा सर्वात किफायतशीर प्लॅन, किंमतही कमी
Airtel प्लॅन्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी 155 रुपयांमध्ये 24 दिवसांची वैधता देत आहे. हा प्लॅन वापरकर्त्यांना 1GB डेटा देतो, जो तुम्ही या 24 दिवसांमध्ये कधीही वापरू शकता. कॉलिंगसाठी एअरटेलचा हा स्वस्त प्लॅन तुमच्यासाठी चांगला ठरेल, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण वैधतेसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळेल.
यासोबतच कंपनीच्या या प्लॅनमध्ये 300 SMS ची सुविधाही देण्यात आली आहे. यावेळी एअरटेल वापरकर्त्यांकडे कॉलिंग, डेटा आणि वैधतेसाठी सर्वात कमी किंमतीचा 155 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे.
Jio कंपनीच्या 155 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, हा प्लॅन वापरकर्त्यांना Airtel च्या तुलनेत अधिक दिवसांची वैधता देतो. तुम्हाला जिओ प्लॅनमध्ये पूर्ण 28 दिवसांची वैधता मिळते. डेटाच्या बाबतीतही जिओचा प्लॅन एअरटेलपेक्षा एक पाऊल पुढे आहे. Jio च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 2GB डेटा मिळतो. याशिवाय प्लॅनमध्ये कॉलिंग आणि SMS सुविधा एअरटेल प्लॅनप्रमाणेच आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 300 SMS फ्री मिळतात.