भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार ब्रॉडबँड इंटरनेट पुरवत आहेत. काहींचा 100 Mbps प्लॅन आहे, तर काहींचा 300 Mbps स्पीड ब्रॉडबँड प्लॅन आहे. मिडरेंज ब्रॉडबँड प्लॅन 100 Mbps स्पीडचे आहेत. हे प्लॅन्स घरून काम करण्यासाठी किंवा छोट्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी योग्य आहेत. आजच्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Airtel आणि BSNL च्या सर्वोत्तम 100 Mbps ब्रॉडबँड प्लॅनबद्दल सांगणार आहोत.
हे सुद्धा वाचा : Tecno ने भारतात लाँच केला आपला सर्वात महागडा फोन, काय आहे किमंत ?
Airtelचा हा रु. 799 प्लॅन विंक म्युझिक, शॉ अकादमी आणि एअरटेल एक्सस्ट्रीमच्या सबस्क्रीप्शनसह येतो. यामध्ये अनलिमिटेड लोकल-STD कॉलिंग उपलब्ध असेल. याशिवाय या प्लॅनमध्ये 100Mbps च्या स्पीडवर इंटरनेट मिळेल. यामध्ये एकूण 3.3TB डेटा मिळणार आहे. एअरटेलच्या या प्लॅनवर तुम्ही आरामात 4K व्हिडिओ देखील बघता येईल.
BSNL च्या या प्लॅनमध्ये 100Mbps च्या स्पीडवर अमर्यादित इंटरनेट उपलब्ध आहे. BSNL च्या या प्लॅनमध्ये प्रथमच एकूण 1000GB डेटा मिळणार आहे. डेटा संपल्यानंतरही तुम्ही 5Mbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकाल. Hotstar Super, Lions Gate, Shemaroo, Hungama, SonyLIV, Zee5, Voot आणि YuppTV ची मोफत सदस्यता या प्लॅनमध्ये उपलब्ध असेल.