रिलायन्स Jio आणि Airtel झपाट्याने देशात 5G सुविधेचा विस्तार करत आहेत. या वर्षीच्या शेवटपर्यंत देशातील जवळपास सर्व भागात 5G सेवा उपलब्ध असेल, असा दावा कंपन्या करत आहेत. तर आतापर्यंत 5G लाँच झालेल्या क्षेत्रात ग्राहकांनी 5G वापरण्यास देखील सुरुवात केली आहे. Jio युजर्सना वेलकम ऑफर अंतर्गत ही सुविधा मिळतेय. तर Airtel युजर्सना यासाठी काय करावे लागेल? ते सविस्तर बघुयात-
भारती Airtel ने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी फ्री अनलिमिटेड 5G डेटाची घोषणा केली आहे. 239 रूपये आणि त्यावरील सक्रिय डेटा प्लॅनचे ग्राहक कुठल्याही अतिरिक्त शुल्काशिवाय कंपनीच्या नव्या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना Airtel thanks ॲपवरून अनलिमिटेड 5G डेटा ऑफर क्लेम करावे लागेल. जर तुम्ही 5G सक्रिय क्षेत्रात असाल, तरंच तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
– सर्वप्रथम तुम्ही तुमच्या फोनमध्ये Airtel thanks ॲप डाउनलोड करा.
– यानंतर ॲप ओपन केल्याबरोबर तुम्हाला 'Unlimited 5G data exclusive for you' लिहलेले दिसेल.
– तुम्हाला तिथे tap करावे लागेल. त्यानंतर 'क्लेम अनलिमिटेड 5G डेटा' वर tap करा.
– त्यानंतर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. Airtel कडून तुम्हाला Activat च मॅसेज मिळेल.
– आता तुम्ही अनलिमिटेड 5G डेटा सुविधेचा लाभ घेऊ शकता.
दरम्यान, काही प्रकरणांमध्ये ग्राहकांना Airtel 5G क्षेत्रात आपोआप 5G सेवा मिळण्यास सुरुवात झाली असल्याचे चित्र दिसून येते.