Airtel वापरकर्त्यांची मजा ! मिळणार Unlimited 5G Data, फक्त मान्य करावी लागेल ‘ही’ अट

Updated on 17-Mar-2023
HIGHLIGHTS

Airtel वापरकर्त्यांना आता मिळणार Unlimited 5G Data

Airtel 5G अमर्यादित डेटा ऑफर

ऑफर 'कशा'प्रकारे मिळवता येईल ते बघा.

दूरसंचार कंपनी Airtel ने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी Jio 5G वेलकम ऑफरशी स्पर्धा करण्यासाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. Jio आधीच वेलकम ऑफर अंतर्गत वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा ऑफर करत आहे आणि आता Airtel ऑफर अंतर्गत, कंपनी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय आपल्या वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा ऑफर करेल. चला तर बघुयात सविस्तर

हे सुद्धा वाचा : Nokia C12 आज प्रथमच खरेदी करण्याची संधी, प्रत्येकाच्या बजेटमध्ये येईल किंमत

Airtel 5G अमर्यादित डेटा ऑफर

जर तुम्ही Airtel प्रीपेड किंवा Airtel पोस्टपेड वापरकर्ते असाल, तर तुम्ही या Airtel ऑफरचा लाभ घेऊ शकता. कंपनीच्या Airtel Thanks ऍपवर या ऑफरचा लाभ घेता येईल. कंपनीच्या My Jio ऍपला भेट देऊन Jio च्या अमर्यादित 5G डेटा ऑफरचा दावा केला जाऊ शकतो.

ऑफरसाठी काय करावे लागेल?

– सर्वप्रथम, जर तुम्हाला Airtelच्या अमर्यादित 5G डेटा ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमचा प्रीपेड किंवा पोस्टपेड नंबर 239 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.

– तुम्हाला Airtel Thanks ऍपवर जावे लागेल, तुम्हाला ऍपच्या होमस्क्रीनवर 'क्लेम अनलिमिटेड 5G डेटा' असे बॅनर दिसेल.

– बॅनरवर टॅप केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर अनलिमिटेड 5G डेटा लिहिलेला दिसेल आणि तुम्हाला स्क्रीनच्या बॉटमला 'Claim' बटण दिसेल.

– क्लेम बटण दाबल्यानंतर तुम्हाला तुमच्या एअरटेल मोबाइल नंबरवर एक कन्फर्मेशन मॅसेज मिळेल, ज्यामध्ये "तुमच्या नंबरवर अमर्यादित 5G डेटा ऑफर ऍक्टिव्ह झाली आहे", असे लिहलेले दिसेल.

मात्र, या ऑफरचा लाभ फक्त त्या ग्राहकांना मिळेल, ज्यांच्याकडे 5G स्मार्टफोन आहे आणि ते कंपनीच्या 5G क्षेत्रात आहेत.  

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :