जर तुम्ही भरपूर जास्त डाटा वापरत असाल तर भारती एयरटेल कडे आहे याचे उत्तर

Updated on 24-May-2018
HIGHLIGHTS

एयरटेल ने रिलायंस जियो ला टक्कर देत आपले Rs 49, Rs 193 मध्ये येणारे अॅड-ऑन प्लान्स सादर केले आहेत, या प्लान्स मध्ये तुम्हाला 1GB पर्यंत अतिरिक्त डाटा मिळू शकतो.

एयरटेल ने काही दिवसांपूर्वी आपल्या अनलिमिटेड प्लान्स सोबतच आपले काही नवीन डाटा प्लान्स पण सादर केले आहेत, या प्लान्स कडे यूजर्स मोठया प्रमाणात आकर्षित पण झाले आहेत. पण जर या प्लान्स व्यतिरिक्त इतर प्लान्स बद्दल बोलायचे झाले तर एयरटेल कडून सादर झालेल्या अॅड-ऑन प्लान्सना पण महत्व दिले जात आहे, हे प्लान्स पण मोठया प्रमाणावर पसंतीला उतरले आहेत. पण हे प्लान्स सर्वात आधी रिलायंस जियो ने सादर केले होते. यांचे मुख्य काम हे होते की ज्या यूजर्स ची डेली लिमिट संपली आहे, त्यांना अजून जास्त डाटा उपलब्ध केला जावा. ही टेक्निक खुप उपयोगी ठरली. 
पण त्यानंतर एयरटेल ने पण हे प्लान्स सादर करायाला सुरवात केली आहे. एवढेच नाही तर खुप कमी किंमतीत हे लॉन्च केले जात आहेत. ज्यामुळे जास्तीत जास्त यूजर्स यांच्याकडे आकर्षित होत आहेत. एयरटेल ने त्याच दिशेने पाऊल टाकत आपले Rs 49 आणि Rs 193 मध्ये येणारे प्लान्स सादर केले आहेत. 
हे नवीन प्लान्स आंध्र प्रदेश आणि तेलंगाना सह दिल्ली, कर्नाटक आणि अन्य काही सर्कल्स मध्ये सादर करण्यात आले आहेत. टेलीकॉमटॉक च्या एका बातमीनुसार Rs 49 मध्ये येणार्‍या प्लान मध्ये तुम्हाला 1GB डाटा मिळत आहे, ज्याची वैधता तुमच्या प्लान च्या वैधते इतकी आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या फोन मध्ये Rs 249 वाला प्लान 28 दिवसांच्या वैधते साठी 2GB प्रतिदिन च्या हिशोबाने चालू केला असेल तर मूळ प्लान मधील डाटा संपल्यावर तुम्हाला अॅड-ऑन प्लान मधील डाटा मूळ प्लान च्या वैधते पर्यंत वापरता येईल.  
तसेच Rs 193 वाल्या प्लान मध्ये पण तुम्हाला 1GB डाटा मिळत आहे, यात पण तुम्हाला तुमच्या प्लान ची वैधता मिळत आहे, याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या चालू प्लान ची वैधता तुमच्या ऐड-ऑन प्लान च्या वैधता म्हणून मिळेल. 
त्याचबरोबर रिलायंस जियो च्या अॅड-ऑन प्लान्स बद्दल बोलायचे तर कंपनी ने Rs 11 पासून Rs 101 मध्ये येणारे काही प्लान्स सादर केले आहेत. ज्यानुसार Rs 11 वाल्या प्लान मध्ये तुम्हाला 400MB डाटा मिळत आहे, Rs 21 वाल्या प्लान मध्ये तुम्हाला 1GB डाटा मिळत आहे, तसेच Rs 51 वाल्या प्लान मध्ये तुम्हाला 3GB डाटा मिळत आहे आणि Rs 101 वाल्या प्लान मध्ये तुम्हाला 6GB डाटा मिळत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :