Airtel कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी बोनस डेटा ऑफर आणली आहे. या ऑफर्सअंतर्गत कंपनी यूजर्सना 10GB बोनस डेटा फ्री देत आहे. मात्र, लक्षात घ्या की, ही ऑफर सर्व वापरकर्त्यांसाठी जारी केलेली नाही. ही ऑफर फक्त निवडक ग्राहकांना दिली जात आहे. जर तुम्ही त्या लकी ग्राहकांपैकी एक असाल, तर Airtel तुम्हाला तुमच्या एअरटेल नंबरवर 10GB बोनस डेटा SMS द्वारे कळवेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Airtel च्या नव्या ऑफरबद्दल सविस्तर माहिती-
Airtel आपल्या ग्राहकांना 10GB बोनस डेटा देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही ऑफर 209 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्लॅन ॲक्टिव्हेशनवर लागू होईल. म्हणजेच तुम्ही तुमच्या Airtel मोबाईल नंबरवर 209 रुपये किंवा त्याहून अधिकचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन केला तर तुम्हाला 10GB बोनस डेटा मिळू शकतो. पण, ही बोनस डेटा ऑफर सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध नाही. कंपनी काही भाग्यवान ग्राहकांना या बोनस डेटा ऑफरबद्दल SMS द्वारे माहिती देत आहे. ज्यांना मेसेज आला असेल, तेच या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
Airtel च्या बोनस डेटाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला Airtel Thanks ॲपवर जावे लागेल. या ॲपमध्ये तुम्हाला ‘Rewards & Coupons’ विभागात कूपनचा पर्याय दिसेल. या कूपनवर क्लिक करून तुम्ही बोनस डेटाचा लाभ घेऊ शकता. तुम्ही कंपनीने दिलेला हा 10GB डेटा फक्त 1 दिवसासाठी वापरू शकता. तुम्ही कूपन रिडीम करताच तुम्हाला त्या अंतर्गत उपलब्ध असलेला 10GB डेटा 24 तासांच्या आत वापरावा लागेल.
Airtel चे 148, 359 आणि 399 रुपयांचे प्लॅन्स अनेक OTT सबस्क्रिप्शनसह येतात. कारण या तिन्ही पॅकमध्ये तुम्हाला Airtel XStreme Play चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. या सब्स्क्रिप्शनसह तुम्हाला 15 हुन अधिक किंवा 20 हुन अधिक OTT प्लॅटफॉर्मचे बेनिफिट मिळतात. या तिन्ही प्लॅनबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.