Bharti Airtel ने आपल्या Rs 399 वाल्या पोस्टपेड प्लान मध्ये केली मोठी कपात, आता मिळत आहे फक्त

Updated on 10-Sep-2018
HIGHLIGHTS

Bharti Airtel ने आपल्या Rs 399 मध्ये येणार्‍या ब्रॉडबँड प्लान ची किंमत Rs 50 ने कमी केली आहे, आता यूजर्सना हा प्लान खुप कमी किंमतीत मिळणार आहे.

तुम्हाला तर माहितीच आहे की पोस्टपेड सेगमेंट मध्ये भारती एयरटेल एक मोठे नाव आहे. पण आता काही दिवसांपूर्वी आपल्या RED प्लान्स मुळे वोडाफोन पुढे गेली होती. तेव्हा एयरटेल वोडाफोन पेक्षा मागे राहिली होती. पण आता कंपनी ने एक नवीन पाऊल टाकत आणि वोडाफोनला टक्कर देण्यासाठी, आपल्या Rs 399 मध्ये येणार्‍या पोस्टपेड प्लान च्या किंमतीत Rs 50 ची मोठी कपात केली आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 20GB डेटा प्रतिमाह मिळत आहे, हा तुम्हाला 12 महिन्यांसाठी मिळतो. 

एयरटेल च्या Rs 399 वाल्या प्लानची कपातीनंतर किंमत Rs 349 झाली आहे. पण हा डिस्काउंट तुम्हाला फक्त 6 महिन्यांसाठी मिळत आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला 6 महिन्यांसाठी Rs 300 एयरटेल कडून देण्यात येतील. असे असू शकते की एयरटेल ने हे पाऊल नवीन यूजर्सना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उचलले असावे. 

Airtel Rs 399 मध्ये येणार्‍या प्लान मध्ये बदल केल्यानंतर  
जो प्लान्स एयरटेल कडून आता पर्यंत Rs 399 मध्ये उपलब्ध केला जात होता, तो आता तुम्ही Rs 349 मध्ये घेऊ शकता. पण हा प्लान काही अतिरिक्त टॅक्स इत्यादी सह येत आहे. त्याचबरोबर हा फक्त 6 महिन्यांसाठी कमी किंमतीत मिळणार आहे. याचा अर्थ असा की हा प्लान आता नवीन किंमतीत मिळणार आहे. 

Rs 399 मध्ये येणारा पोस्टपेड प्लान 
वर सांगितल्या प्रमाणे जो Rs 50 चा डिस्काउंट एयरटेल च्या Rs 399 वाल्या पोस्टपेड प्लान सोबत देण्यात येत आहे, तो फक्त 6 महिन्यांसाठी आहे. एयरटेल च्या या प्लान मध्ये तुम्हाला 20GB डेटा प्रति माह मिळेल. त्याचबरोबर तुम्ही तुमचा डेटा पुढच्या महिन्यात कॅरी फॉरवर्ड करू शकता. 

एयरटेल चा हा प्लान इथेच संपत नाही, यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे, 100 SMS प्रतिदिन मिळत आहेत. तसेच यात अनलिमिटेड कॉलिंग वर कोणत्याही प्रकारची FUP लिमिट नाही. तसेच या प्लान सोबत काही अन्य सब्सक्रिप्शन आणि ऑफर्स पण मिळत आहेत.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :