दरवाढीनंतरही Airtel देत आहे आकर्षक बेनिफिट्स, ग्राहक खरेदी करतील का ‘हा’ अप्रतिम प्लॅन?
टॅरिफ हाईकनंतर Airtel पोस्टपेड प्लॅनच्या किमतीत देखील वाढ
टॅरिफ वाढण्यापूर्वी Airtel च्या बेस पोस्टपेड प्लॅनची किंमत 399 रुपये होती.
Airtel च्या बेस पोस्टपेड प्लॅनमध्ये मिळतात महत्त्वाचे आणि आकर्षक बेनिफिट्स
इतर खाजगी दूरसंचार ऑपरेटर प्रमाणे भारती Airtel ने देखील आपल्या प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. होय, Jio, Airtel आणि VI ने आपल्या एकत्रच टॅरिफ हाईकची घोषणा केली आहे. ही दरवाढ केवळ प्रीपेड प्लॅनवरच लागू झाली नाही, तर पोस्टपेड ऑप्शन्सवरही दरवाढीचा परिणाम झाला आज. म्हणूनच आता Airtel चा बेस पोस्टपेड प्लॅन्स पूर्वीपेक्षा थोडा महाग झाला आहे. मात्र, त्यात मिळणारे बेनिफिट्स अजूनही ग्राहकांच्या हिताचे आहेत.
Airtel चा बेस्ट पोस्टपेड प्लॅन
टॅरिफ वाढण्यापूर्वी Airtel च्या बेस पोस्टपेड प्लॅनची किंमत 399 रुपये होती. मात्र, या प्लॅनची किंमत आता 449 रुपये इतकी झाली आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये दरमहा 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यासह गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरत असलेल्या भारतीय दूरसंचार उद्योगासाठी पोस्टपेड ARPU चा आकडा वाढण्यास निश्चितच मदत होईल.
Airtel चा 449 पोस्टपेड प्लॅन
Airtel चा 449 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 40GB डेटासह येतो. तसेच, या प्लॅनमध्ये 200GB डेटा रोलओव्हर सपोर्ट देखील उपलब्ध आहे. याशिवाय, ग्राहकांना दररोज 100 SMS ची सुविधाही दिली जाईल. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 3 महिन्यांसाठी ‘Airtel Extreme Play’ चा मोफत लाभ मिळतो.
लक्षात घ्या की, वेबसाइटवरील पोस्टपेड पेजवर 5G ऑफरचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याबरोबरच, नियम आणि शर्तींमध्ये देखील 5G ऑफरचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
‘या’ प्लॅन्ससह मिळणार Airtel 5G डेटा
Airtel दररोज 2GB किंवा त्याहून अधिक डेटा ऑफर करणाऱ्या प्लॅन्ससह रीचार्ज करणाऱ्या सर्व प्रीपेड ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा ऑफर करत आहे. त्यामुळे Airtel पोस्टपेड वापरकर्त्यांना अमर्यादित 5G मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्षात घ्या की, पोस्टपेड प्लॅनसाठी ॲक्टिव्हेशन चार्ज देखील आहे. तुम्ही कोणत्या भागात राहत आहात, त्यानुसार हे शुल्क 250 रुपये किंवा 300 रुपये असेल. तरीही, Airtel पोस्टपेड सिम खरेदी करण्यापूर्वी यामध्ये 5G डेटा मिळेल की नाही? याची खात्री करून घ्यावी.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile