आजकाल सर्व टेलिकॉम ऑपरेटर्स आपले यूजर्स टिकवून ठेवण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन प्लान्स आणि सर्विसेज ऑफर करत असतात. जियो बाजारात आल्यानंतर सर्व कंपन्या एयरटेल, वोडाफोन, आईडिया बीएसएनएल इत्यादी सर्वांनी आपल्या प्लान्सच्या किंमती कमी केल्या आहेत. आज आपण बोलणार आहोत एयरटेलच्या त्या प्रीपेड प्लान्स बद्दल ज्यांच्या बेनिफिट मध्ये कंपनीने वाढ केली आहे.हे प्लान्स Rs 500 च्या श्रेणीत येतात.
या प्लान्सची किंमत Rs 399, Rs 448 आणि Rs 499 पासून सुरु होत आहे. या प्लान्स मध्ये युजर्सना 400MB अतिरिक्त डेटा दिला जाईल.
सुरवात करूया Rs 399 च्या प्लान पासून, या प्लान मध्ये आधी प्रतिदिन 1GB डेटा ऑफर केला जात होता. आता या प्रीपेड प्लान मध्ये युजर्सना प्रतिदिन 1.4GB डेटा ऑफर केला जाईल. या पॅकचे इतर बेनेफिट्स तसेच आहेत. याव्यतिरिक्त सब्सक्राइबर्स अनलिमिटेड कॉल्स आणि प्रतिदिन 100 मेसेजचा वापर करू शकतील. प्लान मध्ये युजर्सना एयरटेल प्रीमियम TV चे सब्सक्रिप्शन, एक वर्षासाठी नॉर्टन मोबाईल सिक्योरिटी आणि Wynk चे सब्सक्रिप्शन मिळत आहे आणि या प्लानची वैधता 84 दिवस आहे.
दुसरा प्लान या लिस्ट मध्ये Rs 448 मध्ये मिळतो ज्यात आधी युजर्सना प्रतिदिन 1.5GB डेटा ऑफर केला जात होता पण आता या प्लान मध्ये युजर्सना 1.9GB डेटा ऑफर केला जाईल.
तिसऱ्या प्लानची किंमत Rs 499 पासून सुरु होत आहे आणि या प्लान अंतर्गत प्रीपेड युजर्सना प्रतिदिन 2GB डेटा ऐवजी 2.4GB डेटा मिळतो. प्लानची वैधता 82 दिवस आहे आणि युजर्स प्लान अंतर्गत अनलिमिटेड कॉल्स आणि प्रतिदिन 100 फ्री मेसेज मिळतात. प्लान अंतर्गत युजर्सना एयरटेल प्रीमियम टीवी, नॉर्टन मोबाइल सिक्योरिटी आणि विंकचे सब्सक्रिप्शन मिळत आहे.