एयरटेल ने आपल्या Rs 399 मध्ये येणाऱ्या प्लान मध्ये काही बदल करत एका वर्षात तुम्हाला 20GB डेटा देण्याची घोषणा केली आहे.
भारती एयरटेल भारतात एक मोठी टेलीकॉम कंपनी म्हणून उदयास आली आहे, विशेष म्हणजे रिलायंस जियो येण्याआधी आणि आल्यानंतर सुद्धा या कंपनी कडे सर्वात जास्त यूजर्स होते. आता कंपनी ने हि परंपरा पुढे नेण्यासाठी एक नवीन घोषणा करताना असे सांगितले आहे कि आता ते आपल्या Rs 399 मध्ये येणाऱ्या प्लान मध्ये तुम्हाला एका वर्षात 20GB डेटा देणार आहेत. या प्लान मध्ये तुम्हाला महिन्याला 20GB डेटा मिळतो, तसेच यात तुम्हाला इतर कॉलिंग बेनिफिट पण मिळत आहेत. त्याचबरोबर यात तुम्हाला 100SMS प्रतिमाह पण मिळतात.
काही दिवसांपूर्वी पण अशीच महिती समोर आली होती पण त्यावेळी समजले नव्हते कि हा बदल महिन्यासाठी आहे कि वर्षासाठी. पण आता हि बाब स्पष्ट झाली आहे, याचा अर्थ असा कि आता पोस्टपेड यूजर्सना Rs 399 मध्ये येणाऱ्या प्लान मध्ये अतिरिक्त 20GB डेटा वर्षभरासाठी मिळणार आहे. तसेच कंपनी चा हा प्लान रोलओवर डेटा सह येतो, याचा अर्थ असा कि 500GB डेटा तुम्ही रोलओवर करू शकता.
काही दिवसांपूर्वी वोडाफोन ने आपल्या Rs 399 आणि Rs 499 मध्ये येणाऱ्या प्लान्स मध्ये बदल केले आहेत. त्याचबरोबर वोडाफोनच्या Rs 399 मध्ये मिळणाऱ्या प्लान मध्ये 40GB डेटा दरमहिन्याला मिळत आहे. तसेच Rs 499 वाल्या प्लान मध्ये कंपनी 75GB डेटा दरमहिन्याला देत आहे. तसेच एयरटेल ने पण आपल्या Rs 499 मधील प्लान मध्ये वोडाफोन सारखेच बदल केले आहेत आणि आता कंपनी ने आपल्या Rs 399 मध्ये मिळणाऱ्या प्लान मध्ये बदल केला आहे.