HIGHLIGHTS
गेल्यावर्षी Bharti Airtel ने हे रिचार्ज प्रीपेड प्लान्स बंद केले होते आणि त्याजागी काही कमी किंमतीचे प्लान्स लॉन्च करण्यात आले होते.
गेल्यावर्षी म्हणजे ऑक्टोबर 2018 बद्दल बोलायचे झाले तर भारती एयरटेल आणि वोडाफोन ने त्येंच्या टॉक टाइम देणारे रिचार्ज प्लान्स पूर्णपणे त्यांच्या पोर्टफोलियो मधून काढून टाकले होते. पण दोन्ही कंपन्यांनी इतर काही प्लान्स लॉन्च केले होते. पण हे दोन्ही या कंपन्यांच्या यूजर्ससाठी चांगले नव्हते.
यामुळेच अनेक यूजर्स ने एयरटेल सोडून इतर टेलीकॉम कंपनी स्वीकारली होती आणि एयरटेल ने भरपूर यूजर्स गमावले होते. पण आता पुन्हा एकदा आपले हेच यूजर्स पुन्हा मिळवण्याच्या हेतूने एयरटेल ने एक मोठे पाऊल टाकले आहे. Bharti Airtel ने आपले Rs 100 आणि Rs 500 मध्ये येणारे प्रीपेड रिचार्ज प्लान्स पुन्हा एकदा सादर केले आहेत.
एयरटेल चे हे प्लान्स पाहता आपण असे बोलू शकतो कि जेव्हा तुम्ही माय एयरटेल ऍप मध जाऊन या प्लान्स बद्दल सर्च करता तेव्हा तुम्हाला हे मिळतात, पण काही दिवसांपूर्वी हे प्लान इथे नव्हते. या रिचार्ज प्लान्स मध्ये कंपनीचे दोन प्रीपेड प्लान्स आहेत. याचा अर्थ असा आहे कि आता तुम्ही माय एयरटेल ऍप वर Rs 100 आणि Rs 500 मध्ये येणारे प्लान्स पण बघू शकता.
जर Rs 100 मध्ये येणाऱ्या प्रीपेड रिचार्ज प्लान बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला यात 28 दिवसांच्या वैधतेसह Rs 81.75 चा टॉक टाइम देत आहे. तसेच Rs 500 च्या प्लान बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला Rs 420.73 चा टॉक टाइम मिळत आहे आणि याची वैधता पण 28 दिवसांची आहे.
विशेष म्हणजे हे दोन्ही प्लान्स गेल्यावर्षी बंद केल्यानंतर कंपनीने Rs 35 च्या सुरवाती किंमतीती येणारा प्लान को सादर केला होता. पण यामुळे एयरटेल ने आपले यूजर्स गमवायला सुरवात केली होती. अर्थात् एयरटेलला बरेचसे यूजर्स याचकारणामुळे सोडून गेले. पण आता याच यूजर्सना मिळवण्यासाठी कंपनी ने पुन्हा एकदा हे दोन्ही प्लान्स सादर केले होते.