Airtel भारतातील आघाडीची दूरसंचार ऑपरेटर आहे. कंपनीकडे ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्लॅन्स आहेत. यामध्ये अमर्यादित इंटरनेट, हाय-स्पीड 5G डेटा पॅक आणि अगदी मोफत OTT सबस्क्रिप्शन्सचा देखील समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला 200 रुपयांअंतर्गत येणाऱ्या Airtel प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. बघा सविस्तर-
आता कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन 155 रुपयांचा आहे, ज्याची वैधता 24 दिवस आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 300 SMS आणि एकूण 1GB डेटा मिळतो. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचा ऍक्सेस तुम्हाला मिळणार आहे.
हा रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 300 SMS आणि एकूण 2GB डेटा मिळणार आहे. हा प्लॅन वरील प्लॅनप्रमाणे अतिरिक्त फायद्यांसह येतो.
कंपनी 199 चा प्लॅन देखील ऑफर करते. यामध्ये एकूण 3GB डेटा, STD आणि रोमिंग नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 30 दिवसांच्या वैधतेसह 300 SMS चा लाभ मिळणार आहे. अतिरिक्त फायद्यांमध्ये Wynk आणि Hello Tunes चा ऍक्सेस उपलब्ध आहे.
हा प्लॅन 200 रुपयांपेक्षा जरा जास्त किमतीचा आहे. पण जर तुम्हाला दैनंदिन डेटाच्या सुविधेसह प्लॅन हवा असेल तर हा प्लॅन बजेटमध्ये उत्तम पर्याय आहे. यात 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. तसेच, वरील सर्व प्लॅन्सप्रमाणे यात देखील Hello Tunes आणि Wynk Music चे अतिरिक्त फायदे मिळणार आहेत.