फॅमिली मेम्बर्ससाठी AIRTEL सर्वोत्तम प्लॅन्स, 250GB पर्यंत डेटा, Amazon Prime आणि Hotstar सोबत Netflix देखील फ्री

फॅमिली मेम्बर्ससाठी AIRTEL सर्वोत्तम प्लॅन्स, 250GB पर्यंत डेटा, Amazon Prime आणि Hotstar सोबत Netflix देखील फ्री
HIGHLIGHTS

AIRTEL चे 1,199 आणि 1,599 रुपयांचे पोस्टपेड प्लॅन

या प्लॅनमध्ये 1 नियमित कनेक्शनसह तीन ऍड-ऑन कनेक्शन दिले जातील

प्लॅन्समध्ये OTT प्लॅटफॉर्म्सचे देखील बेनिफिट मिळेल

तुम्हाला NETFLIX चा मोफत आनंद घ्यायचा असेल, तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही. दूरसंचार कंपनी AIRTEL आपल्या पोस्टपेड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्ससह DISNEY + HOTSTAR आणि AMAZON PRIME चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. या प्लॅनमध्ये 1 नियमित कनेक्शनसह तीन ऍड-ऑन कनेक्शन दिले जात आहेत, जेणेकरून कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या आवडीचे चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घेता येईल. 

कंपनीच्या या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी 250GB पर्यंत डेटा देखील उपलब्ध असेल. AIRTEL चे हे प्लॅन्स 1,199 आणि 1,599 रुपयांचे आहेत. चला तर मग जाणून घेऊया या प्लॅन्समध्ये कंपनी काय ऑफर करत आहे.

हे सुद्धा वाचा : रिलायन्स JIOची मोठी घोषणा, दिवाळीपर्यंत सुरू होणार 5G सेवा, मिळणार उत्तम इंटरनेट स्पीड

AIRTELचा 1199 रुपयांचा प्लॅन 

AIRTEL च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसाठी दोन ऍड-ऑन कनेक्शन मिळतील. कंपनीचा हा प्लॅन अमर्यादित कॉलिंगच्या लाभासह येतो. या प्लॅनमध्ये 150GB मासिक डेटा उपलब्ध आहे. प्लॅनच्या ऍड-ऑन कनेक्शनसाठी दरमहा 30GB ऑफर केले जात आहे. यामध्ये कंपनी 200GB पर्यंत डेटा रोलओव्हर बेनिफिट देखील देत आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Disney+ Hotstar सह Netflix Basic चे मोफत सबस्क्रिप्शन आणि 6 महिन्यांसाठी Amazon Prime सदस्यत्व समाविष्ट आहे.

AIRTEL चा 1599 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये, तुम्हाला एका नियमित कनेक्शनसह तीन ऍड-ऑन कनेक्शन मिळतील. प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग दिले जात आहे. इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला AIRTEL च्या या फॅमिली प्लॅनमध्ये 250 GB मासिक डेटा मिळेल. ऍड -ऑन कनेक्शनमध्ये उपलब्ध डेटा 1,199 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे फक्त 30 GB आहे. 

त्याबरोबरच, एअरटेलच्या या प्लॅनमध्ये 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हरचा फायदाही मिळतो. दररोज 100 SMS  ऑफर करणार्‍या या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix Standard चे बेसिक सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय, कंपनी प्लॅनमध्ये 6 महिन्यांसाठी विनामूल्य Amazon प्राइम मेंबरशिप आणि डिझनी + हॉटस्टारवर एक वर्षासाठी फ्री ऍक्सेस देखील देत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo