Airtel-Netflix Plan: कंपनीने केली युजर्सच्या मनोरंजनाची सोय, वेगळे सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही

Airtel-Netflix Plan: कंपनीने केली युजर्सच्या मनोरंजनाची सोय, वेगळे सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही
HIGHLIGHTS

Airtel कडे दोन पोस्टपेड प्लॅन आहेत, ज्यासोबत Netflix सब्स्क्रिप्शनची मोफत सोय

वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये 3 मोफत फॅमिली ऍड-ऑन कनेक्शन देखील मिळतात.

यात SMS, कॉलिंग 200GB हाय-स्पीड डेटाचा लाभ मिळतो.

तुम्हाला तर माहितीच आहे, आजच्या काळात लोकांना घरात बसून चित्रपट आणि महत्त्वाचे म्हणेज सिरीज बघायला आवडतात. त्यामुळे देशात फक्त Netflix, Amazon Prime, Sony Liv, Disney+ आणि Hotstar वर टीव्ही शो, ओरिजनल्स आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत. जर लोकांना OTT प्लॅटफॉर्म Netflix चे मोफत सब्स्क्रिप्शन हवे असेल, तर तुम्हाला फक्त Airtel चे एक रिचार्ज करावे लागेल. होय, आज आम्ही तुम्हाला Airtel च्या त्या पोस्टपेड प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला मोफत Netflix सब्सक्रिप्शन मिळेल.

Airtel-Netflix Plan

वर सांगितल्याप्रमाणे, आम्ही Airtel च्या पोस्टपेड प्लॅन्सबद्दल बोलणार आहोत. Airtel कडे दोन पोस्टपेड प्लॅन आहेत, ज्यासोबत Netflix सब्स्क्रिप्शनची मोफत सोय करण्यात आली आहे. त्या प्लॅन्सची किंमत 1,199 रुपये आणि 1,499 रुपये इतकी आहे. 

airtel

Airtel चा 1,199 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन:

वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये 3 मोफत फॅमिली ऍड-ऑन कनेक्शन देखील मिळतात. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये 150 GB पर्यंत डेटा रोलओव्हरचा फायदा देखील उपलब्ध आहे. तसेच, तुम्हाला प्लॅनमध्ये दररोज 100SMS चा लाभही मिळेल.

मुद्द्यावर येत असताना, तुम्हाला या प्लॅनमध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Netflix चे सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. म्हणजेच या OTT प्लॅटफॉर्मचा लाभ घेण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. यासोबतच Amazon Prime आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शनही या प्लॅनमध्ये दिले आहे.

Airtel चा 1,499 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन:

netflix

Airtelचा 1,499 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन देखील वरील प्लॅनप्रमाणे कॉलिंग, SMS आणि डेटा सुविधा प्रदान करतो. यात 200GB हाय-स्पीड डेटाचा लाभ मिळतो. यामध्ये 100 SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. तुम्हाला प्लॅनमध्ये अप्रतिम OTT लाभ मिळणार आहेत, यात Amazon Prime Video, Netflix Basic आणि Disney + Hotstar Mobile चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. 

Airtel पोस्टपेड प्लॅन्ससह तुम्हाला काही विशेष लाभ मिळतात. 

 तुमचे सिम कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय सक्रिय करता येईल. त्याबरोबरच, सिम तुमच्या घरापर्यंत मोफत पोहोचवले जाईल. पोस्टपेड प्लॅन तुम्हाला मोफत LIVE टीव्ही आणि चित्रपट बघण्याचा लाभ देते. तुम्हाला म्युझिक स्ट्रीमिंग App सह तीन OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.  

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo